Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

प्राथमिक शाळेच्या जागेवरील अतिक्रमण हटविण्याची मागणी ग्रामस्थांचे पंचायत समितीसमोर उपोषण सुरू

Responsive Ad Here


देवधाबा : येथील मराठी प्राथमिक शाळेच्या जागेमध्ये केलेले अतिक्रमण हटवावे, या मागणीसाठी देवधाबा येथील भागवत रघुनाथ बोदडे यांनी पंचायत समिती कार्यालयासमोर २६ जानेवारीपासून उपोषणाला सुरुवात केली.


देवधाबा येथील भागवत बोदडे यांचे वडील रघुनाथ तुकाराम बोदडे यांनी सन १९५४ ला मराठी प्राथमिक शाळा  देवधाबा यांना शाळेच्या इमारतीसाठी जमीन दान दिली. त्या जमिनीचा शाळा समितीच्या नावाने महसूल दप्तरी सातबारा आहे.


त्यांच्या वडिलांनी दान दिलेल्या भागात दोन शाळा इमारती, क्रीडांगण व इतर तीन-चार वर्ग खोल्या आहेत. उर्वरित जागेवर अतिक्रमण झाले असून, ते हटविण्यात यावे अशी मागणी भागवत बोदडे दोन ते तीन वर्षांपासून करीत आहेत. ग्रामपंचायत कार्यालय शाळा व्यवस्थापन समितीकडे त्यांनी तक्रार केली.


त्यांनी शाळेच्या विरोधात २ एप्रिल २०२२ रोजी उपोषण केले होते. त्यावेळी बोदडे यांना तत्कालीन गटशिक्षण अधिकारी यांनी पत्र देऊन अतिक्रमित जागेचे मोजमाप करून अतिक्रमण काढण्यात येईल, असे आश्वासन दिले होते.मात्र, त्यानंतर जागेची कोणतीही मोजणी करण्यात आली नाही. त्यामुळे बोदडे यांनी २६ जानेवारीपासून प. सं. कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. वडिलांनी दान दिलेल्या ७ एकर ५ गुंठे जमिनीची मोजणी करून त्यावरील अतिक्रमण हटविण्याची मागणी केली आहे.