Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

तरुणांसाठी खुशखबर! हिवरखेड मध्ये २६ फेब्रुवारी रोजी होणार रोजगार मेळावा

Responsive Ad Here

तब्बल २०० च्यावर जागांवर नोकरीची संधी


हिवरखेड प्रत्तीनिधी जितेश कारिया

    भारत सरकार द्वारा पुरस्कृत नेहरू युवा केंद्र अकोला जिल्हा कार्यालय व आकांक्षा युवा मंडळ हिवरखेड ता तेल्हारा मार्फत अकोला जिल्ह्यात करिअर मार्गदर्शन व रोजगार मेळावा कार्यक्रम राबविण्यात येत असून या मेळाव्यात योजनांची माहितीही मिळणार आहे. दिनांक रविवार २६ फेब्रुवारी २०२३ रोजी सहदेवराव भोपळे कनिष्ठ महविद्यालय हिवरखेड, ता. तेल्हारा जिल्हा अकोला  “भव्य रोजगार  मेळावा” आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात विविध नामवंत कंपन्या, उद्योग, कॉर्पोरेट क्षेत्र, सेवा क्षेत्र यामधील २०० च्यावर इतके रोजगार उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. मेळाव्यात या नोकऱ्यांसाठी कंपन्यांकडून थेट मुलाखती घेतल्या जाणार असून, नोकरी इच्छुक उमेदवारांनी मेळाव्यात सहभाग घ्यावा, असे आवाहन श्री महेश सिंह शेखावत जिल्हा युवा अधिकारी अकोला जिल्हा यांनी केले आहे.

मेळाव्यामध्ये सीसीडी, एलएफ लॉजिस्टिक, UIDIA प्रोजेक्ट, टेक महिंद्रा इत्यादी उद्योग, कंपन्या सहभागी होणार आहेत. दहावी, बारावी, पदवीधर, आयटीआय, पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग पदवी इत्यादी पात्रताधारक उमेदवारांसाठी मेळाव्यात बँकिग, आयटीआयएस, टुरिझम, हॉस्पिटिलिटी, एचआर, ॲप्रेंटिसशीप, डोमॅस्टिक वर्कर, इलेक्ट्रॉनिक्स, मॅनेजमेंट तसेच मिडीया अँड एंटरटेनमेंट अशा विविध क्षेत्रातील पदे उपलब्ध आहेत.



नेहरू युवा केंद्र अकोला जिल्हा कार्यालय व आकांक्षा युवा मंडळ हिवरखेड ता तेल्हारा मार्फत अकोला जिल्ह्यात करिअर मार्गदर्शन कार्यक्रम राबविण्यात येत असून विविध प्रशिक्षण योजनांची माहितीही मेळाव्यात मिळणार आहे. तसेच तज्ज्ञामार्फत उद्योजकता मार्गदर्शन आणि करियरविषयक समुपदेशनही करण्यात येणार आहे. मेळाव्याचे उद्घाटन सकाळी ९.०० वाजता मा. श्री. विजयजी चव्हाण ठाणेदार पोलीस स्टेशन हिवरखेड, यांच्या हस्ते  तसेच प्रमुख व्याख्याते म्हणून श्री राजीव जी खारोडे संचालक राजे संभाजी अकॅडमी अकोट, श्री भवानी प्रताप देशमुख संस्थापक युवाशक्ती संघटना तेल्हारा, श्रीमती दीपिका देशमुख सर्वोदय महिला उद्योग तेल्हारा, श्री राहुल टाले अकोला जिल्हा मार्केटिंग अधिकारी एमकेसीएल पुणे, यांचे मार्गदर्शन राहणार आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रण माननीय श्री महेश सिंह शेखावत जिल्हा युवा अधिकारी नेहरू युवा केंद्र अकोला व सहनिमंत्रक डॉ. मयूर लहाने अशासकीय सदस्य जिल्हा मराठी भाषा समिती अकोला, कार्यक्रमाचे आयोजक सर्व पदाधिकारी व स्वयंसेवक आकांक्षा युवा मंडळ हिवरखेड तालुका तेल्हारा जिल्हा अकोला हे राहणार आहे. 

युवक व युवतींनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा व संधीचे सोने करावे असे आवाहन माननीय श्री महेश सिंह शेखावत जिल्हा युवा अधिकारी नेहरू युवा केंद्र अकोला यांनी केले आहे.