Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

दागिने पाँलिश करण्याच्या बहाण्याने चोरी करणार्या परराज्यातील दोघांना अटक; पहुर पोलिसांची कारवाई

Responsive Ad Here



जामनेर प्रतिनिधी 

जामनेर तालुक्यातीलपहुर पोलिस ठाणे हद्दीतील वसंत नगर येथे दागिने पाँलिश करण्याच्या बहाण्याने हातचलाखी ने  दागिने चोरून नेणार्या परराज्यातील टोळीतील दोघांना पहुर पोलिसांनी अटक केली आहे. सविस्तर माहिती अशी की, पहुर पोलिस ठाणे अंतर्गत फत्तेपूर दूरक्षेत्रातील कार्यरत पोलिसांना परिसरात  वसंत नगर येथे बिहार राज्यातील काही जण पाँलिश करण्याच्या बहाण्याने स्रियांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांच्या कडील सोन्याच्या व चांदीच्या दागिन्यांची पाँलिश करून देण्याचा बहाण्याने ते दागिने केमिकल मध्ये वितळवून किंवा हातचलाखी ने चोरून नेणारे गावात हिंडत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तात्काळ त्यांना ताब्यात घेतले. बबलू अबलु मिया(वय३३),व मो.शहेंशाह मो.सादीक (वय २३)दोन्ही रा.पवसिया ता.गोपालपूर जिल्हा भागलपूर (बिहार) यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.त्यांंच्या विरुद्ध पहुर पोलिस ठाण्यात गु.र.नं.४८/२०२३भा.दं.वि.कलम ४०६,४२०,३४प्रमाणे दाखल करण्यात आला आहे. 

ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक राजकुमार, अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, सहा. पोलिस अधीक्षक अभयसिंग देशमुख पाचोरा विभाग, यांच्या मार्गदर्शन खाली पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे, पोलिस उपनिरीक्षक संदिप चेडे,पोहेकाँ. किरण शिंपी, विनय सानप, प्रविण चौधरी, दिनेश मारवडकर,अरुण पाटील, राहुल जोहरे,जिजाबराव कोकटे,गोपाळ गायकवाड, अनिल राठोड यांनी केली.