Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

सायाळची शिकार करणारे चौघे वनविभागाच्या जाळ्यात

Responsive Ad Here

  


    मुक्ताईनगर तालुक्यातील चिंचखेडा खुर्द शिवारातील शेतातील शेडमध्ये धुलिवंदनच्या दिवशी वन्यप्राणी सायळची (साळिंदर) शिकार करीत त्याच्या मटणावर ताव मारण्यापूर्वीच वनविभागाच्या पथकाने चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   मुक्ताईनगर तालुक्यातील मौजे चिंचखेडा खुर्द येथील शेतकरी सुपडा मेनकर यांच्या गट क्रमांक ३८ मधील शेतात वन्यप्राणी सायाळची शिकार करून काही जण त्यास कापत असल्याची माहिती जळगावचे उपवनसंरक्षक विवेक होशिंग, सहाय्यक वनसंरक्षक उमेश बिराजदार, मानद वन्यजीवरक्षक विवेक देसाई, मुक्ताईनगर तालुक्यातील वढोदा वनपरिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल सचिन ठाकरे यांना मिळाली. 

    वढोदा वनपरिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल सचिन ठाकरे यांनी वनपाल बी. आर. मराठे, वनरक्षक ज्ञानोबा धुडगंडे, राम आसुरे, बी. बी. थोरात, गोकुळ गोसावी, वनमजूर अशोक तायडे, अशोक पाटील यांचे पथक नियुक्त केले. पथकाने चिंचखेडा खुर्द शिवारात वन्यप्राणी सायळचे मांस चुलीवर शिजत असताना त्यावर संशयितांकडून ताव मारण्यापूर्वीच छापा टाकला. याप्रकरणी निवृत्ती ऊर्फ बाबूराव मेनकार, ऋषिकेश अहिरकर, सुपडा मेनकार (सर्व रा. चिंचखेडा खुर्द, ता. मुक्ताईनगर), शंकर सपकाळ (रा. बुलडाणा) यांना अटक करण्यात आली. पथकाने घटनास्थळावरून रक्ताने माखलेली काठी, सायाळचे चार पंजे आणि अर्धवट जळालेले सायाळचे काटे जप्त केले. वनक्षेत्रपाल सचिन ठाकरे तपास करीत आहेत. सुपडा मेनकर यांना ताब्यात घेत विचारपूस व चौकशी केली. याप्रकरणी वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अन्वये वन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.