Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

शिंगायत येथील तरुणाच्या खून प्रकरणी आरोपीस ४ दिवसांची पोलिस कोठडी

Responsive Ad Here

जामनेर प्रतिनिधी

जामनेर तालुक्यातील पहूर -सोनाळा शिवरस्त्यावर दि.२१रोजी सांयकाळी३ते४वाजेच्या सुमारास शिंगायत येथील तरुणाच्या निर्घृण  खून  प्रकरणी गावातीलच एका तरुणाच्या  जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या २४ तासात मुसक्या आवळल्या होत्या. आरोपीला आज दि.२३रोजी जामनेर न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यास दि.२६पर्यंत४दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. 

     दारूच्या नशेत दि.२१रोजी शिंगायत येथील प्रमोद उर्फ बाळू भगवान वाघ(वय३७) याची दगडाने ठेचून निर्घूणपणे हत्या करण्यात आली होती .  या हत्येप्रकरणी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या २४ तासात शिंगायत येथील रविंद्र उर्फ बाळू भगवान हडप(वय४१)  यांस शिंगायत येथून  ताब्यात घेऊन पहुर पोलिसांच्या ताब्यात देऊन खूनाचा गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यास अटक करण्यात आली होती. आज दि.२३रोजी त्यास जामनेर न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यास दि.२६पर्यंत४दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.