जामनेर प्रतिनिधी
जामनेर तालुक्यातील पहूर येथील महावीर पब्लिक स्कूल चे विद्यार्थी सन २०२२/२३ मध्ये एमटीएस व आँलपियाड परिक्षेत राज्य पातळीवर तसेच मेरीट मध्ये यशस्वीपणे उत्तीर्ण झाल्याने त्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांंसहबक्षिसे व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. आज दि.०९/०४/२३ रोजी हा गुणगौरव कार्यक्रम शाळेत आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पहुर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रतापराव इंगळे होते.
प्रमुख उपस्थिती म्हणून शाळेचे चेअरमन प्रदीप लोढा, उपाध्यक्ष तेजराज जैन, सचिव दीपक लोढा, उपसरपंच व संचालक शाम सावळे ,सहयोगी संचालक शैलेश पाटील,संचालक पंकज लोढा, विपीन लोढा ,कृषी पंडित पतसंस्थेचे चेअरमन बाबुराव पांढरे,गणेश पांढरे,एस.एस. गावंडे,ग्रा.पं.सदस्य ईश्वर बारी, तुकाराम बारी,, अशोक घोंगडे ,राजू जेंटलमॅन, आदी मान्यवर उपस्थित होते. प्रथम स्वर्गीय कृषी पंडीत मोहनलाल लोढा व महावीर भगवान यांच्या स्मृतीस माल्य अर्पण व सरस्वती पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली.यावेळी एमटीएस व आँलपियाड परिक्षेत उत्कृष्ट गुण संपादन व राज्य पातळीवर आलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांसह स्मृतिचिन्ह व पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षिका सौ.नेमाडे ,दिपाली पाटील ,कंडारे ,लाड ,वर्षा वैदकर व मुख्याध्यापिका सौ.एस.आर. कुलकर्णी, यांचाही यावेळी पोलिस निरीक्षक प्रतापराव इंगळे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी रामचंद्र चव्हाण , शेख आसिफ , सर्व शिक्षिका व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन सौ.कंडारे यांनी तर आभार शाम सावळे यांनी मानले.यावेळी विद्यार्थी, पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.png)
