जामनेर प्रतिनिधी
जामनेर शहरासह जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी नेरी तोंडापूर पहुर आदी ठिकाणी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन तसेच ठीक ठिकाणी शोभायात्रा काढण्यात आली आहे जामनेर तालुक्यातील पहूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर मधून शोभायात्रा ला सुरुवात होऊन जामनेर रोड असलेल्या गौतम बुद्ध मंदिरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महावीर गौतम बुद्ध यांच्या पूजन करून कसबे बाजारपेठ मेन रोड मार्ग शोभायात्रा काढण्यात आली.
या शोभायात्रेत पोलीस निरीक्षक प्रतापराव इंगळे माजी जिल्हा परिषद सदस्य राजधर पांढरे शिवसेनेचे नेते गणेश पांढरे उपसरपंच श्याम सावळे सामाजिक कार्यकर्ता प्रफुल पाटील ईश्वर बाबूजी पत संस्थेचे चेअरमन भास्कर पाटील आर टी लेले महाविद्यालयाचे मुख्याध्यापक आर बी पाटील सर माजी जि प सदस्य बाबुराव घोंगडे उपसरपंच राजू जाधव उपसरपंच माजी रवींद्र मोरे किरण खैरनार विजय मोरे यांच्यासह भीमसैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

