Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

बनावट दिव्यांग प्रमाणपत्र बनविण्याचे प्रकार थांबावे; प्रमाणपत्रासोबतच व्यक्तीची पुनर्तपासणी करावे

Responsive Ad Here


असलम परवेज:तालुका प्रतिनिधी

शाळा सुरू होण्या अगोदरच शिक्षक नवीन शाळेत रुजू करण्याची काटेकोर पणे अंमलबजावणी करावी - AMUSS

बुलढाणा- शासनाने ग्रामविकास विभागाच्या दि.०७ एप्रिल २०२१ च्या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांसाठी जिल्हांतर्गत बदली धोरण निश्चित केले होते व यानुसार २०२१-२२ च्या बदल्याही करण्यात आल्या मात्र यात काही सुधारणा करण्याची शिक्षकांची मागणी लक्षात घेता शासनाने पुन्हा एक अभ्यासगट तयार केले आहे. या जिल्हांतर्गत बदली धोरणात विविध सुधारणा करण्यासाठी अखिल महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटनेने जिल्हाधिकारी, बुलढाणा यांच्या मार्फत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे निवेदन सादर केले आहे.

        बदलीपात्र होण्यासाठी ३१ मे ऐवजी ३० जून पर्यंतची सेवा गृहीत धरावी व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्या सामान्यपणे वर्षातून एकदाच दिनांक १ मे ते ३० जून पर्यंत करण्यात याव्या व याची काटेकोर पणे अंमलबजावणी करावी. कोणत्याही परिस्थितीत शाळा सुरू होण्याअगोदर शिक्षक नवीन शाळेत रुजू होईल हे सक्तीचे करावे. 

         नवीन नियुक्त शिक्षकांना तसेच बदलीने जिल्ह्यात आलेल्या शिक्षकांना १० वर्षे एकाच शाळेवर राहण्याची सक्ती करणे हा अन्याय असून बदलीसाठी सलग सेवा १० वर्षे ऐवजी ५ वर्षे करावी. ऑनलाईन बदली प्रणालीत प्राथमिक प्रमाणे जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत असलेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांचाही समावेश करण्यात यावा. महिला शिक्षकांच्या बाबतीत सहानुभूतीपूर्वक विचार करून विशेष संवर्ग शिक्षक भाग एक चा लाभ घेण्यासाठी वय त्रेपन्न वर्षा पेक्षा कमी करावे. मूळ गावापासून कमी अंतरावर काम करण्याची संधी मिळावी. जुन्या 27 फेब्रुवारी 2017 च्या धोरणानुसार एकाच टप्प्यात व कमी वेळेत सहजपणे बदली प्रक्रिया पूर्ण व्हावी असे धोरण निश्चित करावे. अशा विविध मागण्या निवेदनात करण्यात आलेल्या आहेत. 

          संघटनेच्या शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष सय्यद अनीस, राज्यसचिव शेख जमीर रजा, राज्य उपाध्यक्ष जाफर पटेल सरकार, विभागीय सहसचिव रियाज अहमद सह हुसैन कुरेशी, शेख मोबीन, शाहिद हुसैन, शेख नूरुद्दीन, सय्यद रिजवान, वसीम असद आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.