Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

जंगली जनावरांच्या हल्ल्यात 6 शेळ्या ठार हिवरखेड येथील घटनाअल्पभूधारक शेतकऱ्यावर संकटाचे सावट

Responsive Ad Here


हिवरखेड प्रतिनिधी : जितेश कारीया 

हिवरखेड येथील वार्ड क्रमांक 4 खडकी परिसरातील रहिवासी संदीप रमेश कुऱ्हाडे या अल्पभूधारक शेतकऱ्याच्या गावालगत गोठ्यात 6 शेळ्यांची  शिकार वन्य प्राण्याने केल्याची दुर्दैवी घटना दिनांक 14 जून रोजी पहाटे घडली असल्याचे चित्र दिसून आले.माहिती मिळताच तात्काळ वनविभागाचे  वनरक्षक आतिफ हुसेन, तलाठी तेलगोटे, पशुवैद्यकीय अधिकारी दांडळे, ग्रामपंचायत सदस्य सुनील इंगळे, यांनी घटनास्थळी पाहणी केली असता सर्व मंडळी कडून जंगली जनावराणे शिकार केली असल्याची माहिती मिळाली असून परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.काही दिवसा अगोदर याच परिसरातील शेतकरी विनोद पोके यांच्या गाईच्या 3 वासरांची सुदधा शिकार झाली असल्याची माहिती त्यांनी सांगितली.

अगोदर शेतकऱ्यांना कोणत्या ना कोणत्या संकटाला सामोरे जावे लागत आहे त्यात एकूण 6 बकऱ्यांची शिकार झाल्याने सदर शेतकरी हवालदिल झालेला आहे. या शेतकऱ्याला मदत मिळावी अशी मागणी ते वनविभागास करीत आहेत याकडे वन विभागाने तात्काळ लक्ष देऊन या शेतकऱ्याला मदत द्यावी अशी मागणी जनसामान्यातून होत आहे

माझ्याकडे 2 एक्कर शेत असून त्यात  आई, दोघे भावंडे  आणि आमचा संपूर्ण परिवार यांचा उदरनिर्वाह शेती आणि या शेळी पालन मुळे चालतो आता आमच्यावर एका प्रकारे उपासमारीची वेळ आली असून शासनाने आम्हाला तात्काळ मदत द्यावी ही विनंती ---संदीप रमेश कुऱ्हाडे शेतकरी हिवरखेड


सदर जनावरे वन्य प्राण्याच्या हल्ल्यात ठार झाले आहे. शेतकऱ्याचे शेळ्यांचे झालेल्या नुकसानीची भरपाई व्हावी या करिता वनविभाग प्रयत्नशील आहे. ---सुनील राऊत वनपाल अकोट