"अनसिंग येथील मौलाना अबुल कलाम आझाद उर्दू हायस्कूलचा निकाल ९९.९० टक्के ; १००% निकालाची परंपरा कायमच"
असलम परवेज; तालुका प्रतिनिधि
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परिक्षा मंडळ तर्फे मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये मौलाना अबुल कलाम आझाद उर्दू हायस्कूल, अनसिंग या शाळेची विद्यार्थीनी जवेरीया फातेमा शेख याकुब यांनी ८७.६०% टक्के गुण प्राप्त करून शाळेतील ६६ विद्यार्थ्यांमध्ये आपला क्रमांक पटकावले आहे.
जवेरिया हिला विज्ञान व गणित विषयांमध्ये विशेष आवड असल्याचे समजते. त्यामुळे जवेरियाने विज्ञान विषयांमध्ये १००गुणा पैकी ९२ तर गणित मध्ये ८९ गुण मिळवले आहे, तसेच समाज शास्त्र या विषयांमध्ये ८३गुण, उर्दू प्रथम भाषामध्ये ८३गुण, मराठी द्वतिय भाषा मध्ये ९१ तर इंग्रजी भाषामध्ये ७९ गूण प्राप्त करुन घवघवीत यश प्राप्त केले आहे.
शाळेचा निकाल ९०.९०% लागला असून या वर्षी ईयत्ता १० वीच्या परीक्षेला शाळेचे एकुण ६६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्या पैकी ६० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या निकाला मध्ये प्राविण्य श्रेणीत २३ विद्यार्थी प्रथम श्रेणीत ३२ विद्यार्थी व द्वितीय श्रेणीत ०५ विद्यार्थी असे शाळेचे एकुण ६० विद्यार्थी चांगले गुण प्राप्त करून उत्तीर्ण झाले आहे.
यावेळी संस्था अध्यक्ष पांडुरंग ठाकरे,सर्व संस्था चालक मंडळ, मुख्याध्यापक शेख मोहम्मद मुस्तफा यांनी इरम, जवेरिया आणि महेक सह इतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
जवेरिया ने परिवारासह शिक्षकांना दिले आपले यशाचे श्रेय
जवेरियाने आपल्या यशाचे श्रेय देतांना सांगितले की, तिच्या या घवघवीत यशामागे तिच्या आई-वडिलांची प्रेरणा होती, तर काका व काकूंची शाबासकीची थाप तिच्या पाठीशी नेहमीच असायची आणि आजी व आजोबांचा भरभरून आशीर्वाद राहायचा, म्हणूनच ती दणदणीत यश प्राप्त करू शकले. तसेच तिने आपल्या यशाचे श्रेय शाळेचे प्राचार्य शेख मोहम्मद मुस्तफा, आपले मार्गदर्शक शिक्षक शेख बुरहान, मोहम्मद जाकीर, अब्दुल रहेमान यांना समर्पित केले आहे.
यावेळी शिक्षक मोहम्मद मोहसीन, मोहम्मद शारीक, मोहम्मद इमरान, पठाण इमरान खान, अब्दूल मोहसीन, अब्दूल साजीद, इमरान खान, एहतेशामोद्दीन खतीब, शिक्षकेत्तर कर्मचारी मनिष मखमले, मोहम्मद सादिक, अब्दूल अज़िज़ विजय मुसळे यांनी जवेरियाचा पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन मनोबल वाढवले व शुभेच्छा दिल्यात.
या प्रसंगी सर्व मित्र परिवारांनी या यशाबद्दल जवेरिया सह तिच्या आई-वडिल, आजी- आजोबा आणि पूर्ण परिवाराला मिठाई सह शुभेच्छा दिल्या आहेत तसेच तिच्या उज्वल भविष्य आणि उदंड आयुष्याची कामना केली आहे.
