.जामनेर दि २९(सा वा )
जामनेर तालुक्यातील जांभूळ येथील शेतकरी कैलास वडाळे याच्या खून प्रकरणी खूनाच्या गुन्ह्यात अटकेत असलेला आरोपी रमेश मोरे रा.वडाळी यास न्यायालयाने दि.२९ पर्यंत ३ दिवस पोलिस कोठडी सुनावली होती. पोलिस कोठडी ची मुदत संपल्याने आरोपी रमेश मोरे यास आज दि.२९ रोजी जामनेर न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यास पुन्हा २ दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान पहुर पोलिस ठाण्यात नव्याने रुजू झालेल्या पोलिस निरीक्षक सचिन सानप यांना आरोपी रमेश मोरे याच्या कडून मयत कैलास वडाळे याचा मृतदेहाचा शोध लावणे एक आव्हान उभे राहिले आहे.
.jpeg)