"माध्यमिक शालांत परीक्षेत मुलींनीच मारली बाजी"
असलम परवेज;तालुका प्रतिनिधि
लोणार:
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परिक्षा मंडळ तर्फे मार्च-२०२३ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये स्थानिक लोणार येथील इंदिरा गांधी उर्दू हायस्कूलचा निकाल ९३% टक्के लागला आहे. या परीक्षेत मुलींनीच बाजी मारली आहे हे विशेष.
या वर्षी ईयत्ता १०वीच्या परीक्षेला शाळेचे एकुण ७३ विद्यार्थी बसले होते, त्या पैकी ६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या निकाला मध्ये प्रथम श्रेणीत ५० विद्यार्थी व द्वितीय आणि तृतीय श्रेणीत एकत्रित १८ विद्यार्थी असे शाळेचे एकुण ६८ विद्यार्थी चांगले गुण प्राप्त करून उत्तीर्ण झाले आहे.
यामध्ये जेबा मोहम्मद कलीम या विद्यार्थिनींने ८८.००% गुण घेऊन प्रथम स्थान प्राप्त केले तर महेविश शेख नूर हिने ८४.००% गुण प्राप्त करून द्वितीय क्रमांक तसेच अफशा मोहम्मद एजाज हिने ८२.४०% गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक पटकावले आहे. यासोबतच शिफा मोहम्मद मुजाहिद ८२.२०%, उम्मेहानी शेख लुकमान ८१.६०% अल्मास शेख रहेमान ८१.००% आणि मनतशा शमसूद्दीन मलिक ८०.२०% गुण प्राप्त करून या विद्यार्थिनींनी प्राविण्य श्रेणीत आपले नाव समाविष्ट केले आहे.
यावेळी संस्था अध्यक्ष, सर्व संस्थाचालक मंडळ, मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केले व मनोबल वाढून पुढील वाटचालीस मार्गदर्शन केले.
