Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्त झालेल्या प्रिया पाटील हिचा सत्कार संपन्न

Responsive Ad Here


जामनेर दि १७(सा‌वा)

जामनेर तालुक्यातील गारखेडा येथील शेतकरी श्री प्रकाश माणिकराव पाटील यांची मुलगी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतलेल्या परीक्षेत पास होऊन पोलीस उपनिरीक्षक पदी तिची निवड करण्यात आल्याबद्दल आज गारखेडा या मूळ गावी तिचा उत्साहात सत्कार करण्यात आला. गावातून तिची मिरवणूक काढून ग्रामस्थांनी व समाज बांधवांनी तिला शुभेच्छा देत तिचा सत्कार केला.

यावेळी खान्देश तेली समाज मंडळाच्या वतीने देखील तेली समाजाचे संत श्री संताजी जगनाडे महाराज यांची प्रतिमा,शाल,श्रीफळ,बुके देऊन तिचा सत्कार करण्यात आला.यावेळी खान्देश तेली समाज मंडळ महिला आघाडीच्या जळगाव जिल्हा सचिव प्रा.डॉ.सौ.योगिताताई चौधरी,जामनेर तालुका अध्यक्ष श्रीमती स्वातीताई चौधरी,उपाध्यक्ष श्रीमती सोनल जाधव,जामनेर तालुका अध्यक्ष श्री अजय अशोक चौधरी, जामनेर तालुका सचिव निलेश हरी पाटील सर शहराध्यक्ष निलेश रमेश चौधरी,पंचायत समिती सदस्य रमणदादा चौधरी,,संतोष पाटील सर,मुकेश जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी कु.प्रिया हिला मार्गदर्शन करणारे तिचे आई वडील यांचा देखील मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला व त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.