Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

झोडगा येथील तीन भाऊ जागीच ठार

Responsive Ad Here

 नांदुरा बायपास वरील बुलढाणा रोड क्रॉस करणाऱ्या ब्रिजवर दुचाकीची अज्ञात ट्रकला धडक लागून झोडगा ता. मलकापूर येथील दोन सख्खे व एक चुलत भाऊ जागीच ठार झाल्याची घटना ९ ऑगस्टच्या रात्री ८.१५ वाजेच्या दरम्यान घडली. झोडगा गावातील तिघांचे अपघातात प्राण गेल्याने झोडगा गावावर शोककळा पसरली आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, मलकापूर तालुक्यातील झोडगा येथून आंबोडा येथे दुचाकी क्रमांक एमएच २८-बीएन- २७३९ ने जात असतांना नांदुरा बायपास वरील बुलढाणा रोड क्रॉस करणाऱ्या ब्रिजवर दुचाकीची अज्ञात ट्रकला धडक लागली. या झालेल्या अपघातामध्ये दुचाकीवरील उमेश विठ्ठल कंडारकर (वय २३), प्रशांत किसन कंडारकर (वय २६), नितीन किसन कंडारकर (वय यांचा जागीच मृत्यू झाला. या झालेल्या अपघातामध्ये दोघे सख्खे भाऊ तर एक चुलत भाऊ जागीच ठार झाल्याने झोडगा गावावर एकच शोककळा पसरली अपघाताची माहिती मिळतात आ. राजेश एकडे व ओम साई फाउंडेशनचे विलास निंबोळकर, आश्विन फेरण, कृष्णा वसोकार, आनंद वावगे, अजय गवई, राजू बगाडे हे रुग्णवाहिकेसह घटनास्थळी हजर झाले.