Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

मेरी माटी मेरा देश मेरा हिवरखेड मेरा अभिमान

Responsive Ad Here


प्रतिनीधी हिवरखेड जितेश कारिया 


ब्रिटिशांच्या विरोधात झालेल्या स्वातंत्र्याच्या लढाईत हिवरखेड येथील अनेक स्वातंत्र्य संग्राम सेनानी यांचा सहभाग होता. त्यापैकीच एक स्वातंत्र्य योद्धा वीरसेन सखाराम वाकोडे. देशभर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा समारोप मेरी माटी मेरा देश या कार्यक्रमाने होत आहे. त्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्य लढ्यातील *अकोला जिल्ह्यातील हिवरखेडचे स्वातंत्र्य सैनिक विरसेन सखाराम वाकोडे यांचे योगदान फार मोठे वाटते. या लेखातून भावी पिढ्यांना प्रेरणा व माहिती मिळेल हा विश्वास आहे.

स्वातंत्र्य संग्राम सैनिक विरसेन सखाराम वाकोडे हे अकोला जिल्ह्यात असलेल्या तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड येथील  क्रांतिकारक होते. भारतीय जनतेवर जुलूम अत्याचार करणाऱ्या ब्रिटिश सरकार पासून देश स्वतंत्र व्हावा यासाठी नावाप्रमाणे तीव्र आंदोलन करणारे राष्ट्रवीर म्हणून त्यांना ओळखले जायचे. त्यांचा जन्म 11 जानेवारी 1915 ला आर्थिकदृष्टया गरीब परिवारात झाला. 

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जगण्याचा विरसेन वाकोडे यांच्या जीवनावर खूप मोठा प्रभाव होता. हिवरखेड परिसरात असणाऱ्या स्वातंत्र्य लढ्याच्या शिबिरात जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी संपतराव भोपळे यांच्या नेतृत्वात ते इंग्रज विरोधी देशकार्य करत असत. 1942 च्या चले जाव चळवळीत त्यांनी ब्रिटिशांच्या विरोधात सक्रिय सहभाग घेतला. हिवरखेड येथील पोलीस चौकीला आग लावण्याचा प्रयत्न त्यांनी त्यावेळी केला होता. टपाल पेट्या फोडणे, भारताचा स्वातंत्र्य ध्वज फडकवणे, इंग्रज विरोधी घोषणा देणे, सरकारी कागद पत्रांची होळी करणे या सातत्याने झालेल्या आंदोलनात ते सहभागी  झाले होते. या कृत्यात त्यांचा वाढता पुढाकार लक्षात येताच इंग्रज शिपायांनी अटक केली. प्रखर राष्ट्रवाद जपणारे विरसेन वाकोडे यांना राजकीय कैदी म्हणून न्यायालयाने 18ऑगस्ट 1942 ला अकोला मध्यवर्ती तुरुंगात डांबले. तब्बल 20 महिने तुरुंगात कारवास भोगल्यानंतर 21एप्रिल 1944 ला त्यांची मुक्तता करण्यात आली. स्वातंत्र्य लढ्याच्या दरम्यान राष्ट्रपिता महात्मा गांधी हरिजन कार्यार्थ अकोला जिल्ह्यात आले असतांना देवरी ते अकोट हा प्रवास त्यांनी महात्मा गांधीजी यांच्या सोबत केला होता.

15 ऑगस्ट 1972 साली भारताच्या प्रधानमंत्री श्रीमती इंदिरा गांधी यांनी ताम्रपत्र भेट देऊन तर 1984 साली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी सन्मान पत्र देऊन विरसेन वाकोडे यांचा स्वातंत्र्य लढ्यातील स्मरणीय योगदानाबद्दल कार्य गौरव केला होता. भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर हिवरखेड येथे शैक्षणिक, सहकारी संस्था प्रारंभ करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. शासनाच्या वतीने विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.आयुष्यभर गांधी विचारांची सोबत करणारे स्वातंत्र्य संग्राम सैनिक विरसेन सखाराम वाकोडे यांचे निधन 31 मार्च 1996 ला वयाच्या 81 व्या वर्षी जन्मभूमी हिवरखेड येथे झाले.

---तुळशिदास खिरोडकार


 रविभाऊ वाकोडे   स्वातंत्र्य संग्राम सैनिक यांचे नातू