मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्वायत्त संस्था स्थापन करा- शेख अब्दुल रहीम
असलम परवेज
औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांची 16 ऑगस्ट रोजी रामा इंटरनॅशनल हॉटेल येथे जुनी पेन्शन हक्क संघटनेचे राज्य प्रवक्ता शेख अब्दुल रहीम यांनी सदिच्छा भेट घेउन सत्कार केले व राज्यातील 1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत रुजू झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावी हा मुद्दा समोर मांडला. तसेच जे पक्ष जूनी पेन्शन बाबत सकारात्मक निर्णय घेतील त्याच पक्षाला यापुढे कर्मचारी मतदान करतील असे मत शरदचंद्र पवार समोर शेख अब्दुल रहीम यांनी मांडले.
तसेच मुस्लिम समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांसाठी डॉ. ए. पी जे कलाम संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था राज्यातील इतर स्वायत्त संस्था जशी बार्टी, सारथी, महाज्योती प्रमाणेच सुरू करावी अशी मागणीही एका निवेदना द्वारे केली. यावेळी हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशनचे सय्यद ताजीमोद्दिन आदींची उपस्थिती होती.
