Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

शिवसेना( उबाठा) पक्षातर्फे पहुर बस स्थानक परिसरात बेमुदत घंटा नांद आंदोलन सुरू

Responsive Ad Here


                                स्मशान भूमी जवळी  अतिक्रमण हटवण्याची मागणी

जामनेर 

जामनेर तालुक्यातील पहुर येथे शिवसेना शहर शाखा तसेच सुर्यवंशी बारी समाज संयुक्त विद्यमानाने पहुर येथील समशान भूमी जवळील अतिक्रम विरोधात पहुर पेठ ग्रामपंचायत जवळ बस स्थानक परिसरात बेमुदत घंटा नांद आंदोलन आज सकाळी नऊ वाजता सुरू करण्यात आले आहे यावेळी प्रशासनाला वारंवार कळवुनही कारवाई न झाल्याने सूर्यवंशी बारी समाज व शिवसेना शहर शाखेच्या वतीने बेमुदत घंटा नांद आंदोलन सुरू करण्यात आले आहे

या अतिक्रमाबाबत सत्तावीस तीन 2023 रोजी ग्रामपंचायत परिसरात यापूर्वी बेमुदत आंदोलन केले होते लोक वर्गणीतून मोजमापीची शासकीय फी  भरुन तहसीलदार यांच्या आदेशाप्रमाणे मोजमाप करण्याचा आदेश दिला होता संबंधित शेतकऱ्यांने मोजमापासाठी शासकीय कामात अडथळा आणला होता त्यामुळे अतिक्रमण जैसे थे ठेवण्यात आले आहे

सूर्यवंशी बारी समाज सोनार कुंभार खाटीक लोहार भोई तसेच ज्यांच्या सोयीचे असेल त्या समाजासाठी सार्वजनिक स्मशान भूमी जवळील अतिक्रम काढावे या मागणीसाठी सूर्यवंशी बारी समाज व शिवसेना शहर शाखेच्या वतीने आंदोलन सुरू करण्यात आले आहे या आंदोलनात शिवसेना माजी शहरप्रमुख सुकलाल बारी शहर प्रमुख संजय तायडे पत्रकार गणेश पांढरे विभाग प्रमुख दगडू पाटील विनोद ठाकूर शांताराम ठाकूर उपशहर प्रमुख सुभाष पाटील युवासेना उपतालुका अधिकारी अमीन शेख राजू चौधरी प्रकाश बारी हिरा बारी नासीर तडवी विलास देशमुख अर्जुन बारी संजय पाटील दिनेश जाधव दिलीप पांढरे बाबुराव बारी यांच्या समाज बांधव व शिवसेना पदाधिकारी तसेच शिवसैनिक  मोठ्या संख्येने उपस्थित होते