Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

तीन दुचाकींसह चोरट्यास पोलिसांनी घेतले ताब्यात

Responsive Ad Here


मलकापूर प्रतिनिधी-


मलकापूर परिसरातून दुचाकी चोरणाऱ्या एकाबाबत मलकापूर शहर पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून मौजे धरणगाव ता. मलकापूर येथून अटक करण्यात आली असून त्याच्याकडून दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. प्रकरणातील आरोपीस न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याबाबतची माहिती अशी की, मलकापूर परिसरातून गेल्या काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या घटना समोर आल्या होत्या. दरम्यान पोलिसांना १० ऑगस्ट रोजी मिळालेल्या गुप्त माहितीवरून मौजे धरणगाव येथे दुचाकी चोरटा सागर रामदास कोळी रा. मुक्ताईनगर हा फिरत असल्याचे समजले. त्यास सापळा रचून पोलिसांनी धरणगाव येथून अटक केली असता तीन बिना नंबरच्या मोटार सायकल जप्त करण्यात आल्या. सदर कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक सुनिल कडासने। व अप्पर पोलीस अधिकारी अशोक बोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी देवराम गवळी. ठाणेदार अशोकराव रत्नपारखी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि करुणाशिल तायडे, संजय वेरुळकर, पोका आसिफ लेख, ईश्वर वाघ, प्रमोद राठोड, संतोष कुमावत, गोपाल तांदुळकर, प्रविण गवई, पंकज वराडे आदींनी केली.