Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

स्मशान भूमी अतिक्रम विरोधात केला घंटा नांद आंदोलन

Responsive Ad Here

                    

                आश्वासनानंतर आंदोलन घेतले मागे-मंत्री अनिल पाटील यांनी दिली भेट

जामनेर 

जामनेर तालुक्यातील पहूर येथील वाघुर नदीतील पात्राजवळ स्मशान भूमी जवळ एका शेतकऱ्याने अतिक्रम केले असून हे अतिक्रम लेखी तक्रार करूनही न काढल्याने शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षाच्या वतीने घंटा नांद आंदोलन स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वस संध्येला सुरू केले होते तहसील कार्यालयाकडून या अतिक्रमाबाबत पोलीस बंदोबस्त देऊन अतिक्रम काढण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन पत्र देण्यात आले

वाघुर नदीच्या पात्राच्या कडेला बारी समाज व इतर समाजाचीही स्मशान भूमी आहे या स्मशान भूमी जवळ काठावर लागत असलेल्या एका शेतकऱ्याने अतिक्रम केला आहे हे अतिक्रम त्वरित काढावा या मागणीसाठी 14 ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता पहूर बस स्टँड छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना व बारी समाज बांधवान तर्फे घंटा नांद आंदोलन करण्यात आले

या आंदोलनाला महाराष्ट्र राज्याचे पूर्वसन मंत्री अनिल पाटील जळगाव संभाजीनगर महामार्ग जात असताना त्यांनी आपला ताफा थांबवून या आंदोलनात भेट देऊन त्यांना आंदोलन करताना निवेदन सादर केले तसेच रात्री उशिरापर्यंत तशिलदार नानासाहेब आगळे तलाठी प्रमोद इंगळे पोलीस उपनिरीक्षक संजय बनसोड माजी सरपंच प्रदीप लोढा विकास सोसायटीचे चेअरमन साहेबराव देशमुख या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पोलीस बंदोबस्तात मोजणी करून अतिक्रम काढू असे लेखी पत्र देऊन आंदोलन स्थागित करण्यात आले

या आंदोलनात पाठिंबा देण्यासाठी शिवसेना तालुकाप्रमुख एडवोकेट ज्ञानेश्वर बोरसे राष्ट्रवादीचे किरण पाटील शैलेश पाटील प्रदीप भाऊ लोढा राजू भाई जंटलमेन साहेबराव देशमुख शिवाजी कलाल संजय पाटील गावातील सर्व पक्षीय पदाधिकारी व नागरिकांनी या आंदोलनास पाठिंबा दिला या आंदोलनात शिवसेनेचे माजी शहरप्रमुख तथा विकास सोसायटीचे माजी चेअरमन सुकलाल बारी शिवसेना प्रवक्ता तथा पत्रकार गणेश पांढरे शिवसेना शहर प्रमुख संजय तायडे विनोद ठाकूर विजय देशमुख अशोक जाधव अजय जाधव आमिन शेख हिरा बारी अर्जुन बारी प्रकाश बारी आदींनी सहभाग घेतला