जामनेर
जामनेर तालुक्यातील पहूर शेंदुर्णी नेरी येथेमहाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या धनगर समाजाच्या नेत्या तसेच क्रांती शौर्य सेना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कल्याणी ताई वाघमोडे ( बारामती) यांची दवंडी जागर यात्रा निमित्त जामनेर तालुक्यातील पहूर नेरी शेंदुर्णी येथे समाज बांधवांची संवाद साधून शासनाची धनगर समाजाच्या आरक्षण संदर्भात भूमिका आपल्या भाषणातून व्यक्त केली. शेंदुर्णी येथे धनगर समाजाच्या बांधवा मेळाव्यात बोलताना सांगितले की धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र अंमलबजावणी करण्यासाठी धनगर समाजाची मागणी अनेक वर्षापासून ची आहे गेली 75 वर्षात धनगर समाज न्यायाच्या प्रतीक्षेत आहे संविधान कलम 342 अनुसूचित जमातीचे आहे आज पर्यंत कोणत्याच सरकारला धनगर आरक्षणाचे भिजते घोंगडे सोडवता आले नाही आजपर्यंत धनगर समाजाला आरक्षण देण्यास दिलेली आश्वासने हवेतच विरघळून गेली त्यामुळे धनगर जमातीचा रोष वाढत चाललेला आहे 30 ऑक्टोबरला मुंबई येथे आंदोलन करण्यात येणार आहे जर आरक्षण नाही मिळाले तर दिल्ली येथे आंदोलन करण्यात येणार असल्याचे वाघमोडे यांनी सांगितले
याप्रसंगी धनगर समाजाचे नेते तथा पत्रकार गणेश भाऊ पांढरे यांनी याप्रसंगी मनोगत मनोगत व्यक्त केले
यावेळी नगरसेवक राहुल चव्हाण नगरसेवक चंद्रभागाबाई धनगर सुरेश गावंडे गजानन धनगर मुकेश भाऊ ओहोळ अशोक दांडगे दिलीप धनगर विलास धनगर सागर धनगर जितेंद्र धनगर अशोक धनगर अशोक पंढरी धनगर गजानन गरबड धनगर राजेंद्र धनगर प्रल्हाद धनगर यांच्यासह शेंदुर्णी शहरातील सर्व धनगर समाज बांधव माता भगिनी व तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सुरेश गावंडे सर गावंडे सर तर आभार नगरसेवक राहुल धनगर यांनी मानले
