असलम परवेज: लोणार तालुका प्रतिनिधि
शनिवार 21 ऑक्टोबर 2023 रोजी खानकाह हजरत इनायतउल्लाह येथे तरसील अदबी फोरम आणि बज्म अरबाब-ए-सुखन नांदुरा यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील प्रसिद्ध शायर कुदरत नाजिम यांच्या अध्यक्षतेखाली सलीमुद्दीन आमिर शेगाव आणि दीवान मुहम्मद शकील देवलघाट यांच्या सन्मानार्थ भव्य मुशायरा चे आयोजन करण्यात आले. सलीमुद्दीन आमिर आणि दीवान मुहम्मद शकील हे नुकतेच शिक्षकी पेशातून निवृत्त झाले आहेत.तरसील अदाबी फोरम आणि बज्म अरबाब-ए-सुखन नांदुरा यांच्या वतीने कार्यक्रमाचे अध्यक्ष कुदरत नाजिम यांच्या हस्ते या दोन्ही व्यक्तींचा शैक्षणिक क्षेत्रातील सेवेबद्दल गौरव करण्यात आला. मुशायराचे आयोजक अनीस शौक आणि मतीन तालिब सन्मान सोहळ्यात सहभाग होते. राहिल अंजुम यांनी स्वागत समारंभाचे संचालन केले.
या सत्कार कार्यक्रमानिमित्त भव्य मुशायराचे आयोजन करण्यात आले होते.या कवी संमेलनात अमरावतीचे सुप्रसिद्ध कवी अदीब अलीमी व बुलढाणा जिल्ह्यातील अनेक नामवंत कवी सहभागी झाले होते. चिखलीहून आलेले कवी फिरोज सादिक यांनी आपल्या मनमोहक आवाजात नात चे उत्तम शेर सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले. कुदरत नाजीम , सलीमुद्दीन आमिर, अदीब अलीमी, अनीस शौक, खुबैब ताबीश, यासीन जाहिद, कलीम कैफ, फिरोज सादिक, ताहिर शादाब, गुलाम जावेद, माजिद रजा , आसिफ मुनाव्वर , उमर बुलढाणवी, हैदर असद जई, अताउल्लाह अतीफ, याशिवाय स्थानिक कवींमध्ये मतीन तालिब, इस्माईल गोहर, राहील अंजुम आणि अजहर आतिफ यांनी आपल्या कवितांनी श्रोते आणि पाहुणे कवींना खूप प्रभावित केले. विशेष अतिथी म्हणून अफसाना निगार अलीम इस्माईल, मलकापूर येथील शेहजाद खान उर्फ बबलू जमादार, ॲड.शहजाद खान लखनवाडा व खामगाव येथील नावेद अतहर उर्फ बबलू पठाण उपस्थित होते. बज्म अरबाब-ए-सुखन नांदुरा चे अध्यक्ष ॲड.मतीन तालिब यांनी मुशायरा सुंदरपणे सजवला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बज्मचे सचिव वसीम साजिद, स्थानिक कवी अहमद काशिफ, इस्माईल गोहर, राहील अंजुम, अजहर आतिफ, काव्यप्रेमी रफिक जकरिया, बज्म अरबाब-ए-सुखान चे सर्व सदस्य आणि मुशायरा समिती सदस्यांनी मोलाचे परिश्रम घेतले. कवी संमलनाचे सूत्र संचालन मुनव्वर उज जमां बुलढाणा यांनी आपल्या मोहक स्वरात सूत्र संचालन केले आणि मुशायराची मोहकता वाढवली. बज्मचे अध्यक्ष ॲड. मतीन तालिब यांनी आभार व्यक्त केले.
