Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

भोपळे विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्सव संपन्न

Responsive Ad Here

 

हीवरखेड प्रतिनीधी जीतेश करिया

महात्मा फुले शिक्षण संस्था संचालित सहदेवराव भोपळे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्सव, सेवानिवृत्त शिक्षिकांचा सत्कार व पर्यावरण शिक्षण उपक्रमाअंतर्गत ई-पिक पाहणी शेतकरी सहाय्य सप्ताहाच्या उद्घाटन व  बक्षीस वितरणाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या संचालिका तथा शिक्षिका साधनाताई  श्यामशील भोपळे ह्या होत्या. या कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीत सेवानिवृत्त आदर्श शिक्षक दे.ना.महाजन, संस्थाध्यक्ष अनिलकुमार भोपळे, जेष्ठ संचालिका अन्नपूर्णाबाई बंड, निकिताताई उमेश फोफसे, सुनिताताई गजानन बंड, प्राचार्य संतोषकुमार राऊत, पर्यवेक्षक गणेश खानझोडे, सेवानिवृत्त शिक्षक रमेश उगले हे होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन, हारार्पन करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून सेवानिवृत्त शिक्षिका सुमित्राताई रमेश उगले, मीनाताई विलास भोपळे व नवनियुक्त केंद्रप्रमुख प्रमोद पोके यांचा संस्थेच्या वतीने त्यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव म्हणून सत्कार करण्यात आला. तसेच याप्रसंगी पर्यावरण शिक्षण उपक्रमाअंतर्गत ई-पिक पाहणी शेतकरी सहाय्य सप्ताहाचे उद्घाटन महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिलकुमार भोपळे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मान्यवरांसह विद्यार्थ्यांची क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्यावर यथोचित भाषणे झालीत. यावेळी दे.ना.महाजन गुरुजी यांच्या वतीने दरवर्षी त्यांच्या आई स्व.लक्ष्मीबाई नारायणराव महाजन स्मृतीप्रित्यर्थ उत्कृष्ट भाषण सादर करण्यारे विद्यार्थी प्रथम क्रमांक- कृष्णा प्रमोद सदाफळे,दुसरा क्रमांक -पूनम संतोष सुरळकार व  तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस चंचल अशोक अढाऊ ह्यांना उपस्थितांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. याप्रसंगी आपल्या अध्यक्षीय भाषणात सौ.साधनाताई भोपळे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या शैक्षणिक कार्यामुळे समाज विकासासाठी चालना मिळाली असून विद्यार्थ्यांनी त्यांच्या कार्याला स्मरण करून त्यांचे गुण आत्मसात करावे,असे मत प्रतिपादन केले. या कार्यक्रमाचे संचलन वर्गशिक्षक प्रशांत भोपळे यांच्या मार्गदर्शनात वर्ग दहावीच्या विद्यार्थिनी सौम्या दिलीप बाळापुरे, प्रेरणा रामदास येऊल तर आभारप्रदर्शन पल्लवी श्याम वरटकार हिने केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व शिक्षक-शिक्षिका व कर्मचारी वृंद यांनी अथक प्रयत्न केले.