Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

सार्वजनिक शिवजयंती आयोजना निमित्त प्रथम नियोजन बैठक संपन्न

Responsive Ad Here

 

मलकापूर प्रतिनिधी

   सालाबादाप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील सार्वजनिक शिवजयंती उत्सव सोहळा अतिशय भव्य दिव्य व सर्वसमावेशक पद्धतीने साजरा होण्याच्या दृष्टीने प्रथम नियोजन बैठकीचे आयोजन येथील युवाशक्ती व्यायाम शाळेच्या मैदानावर करण्यात आले दि. ४ फेब्रुवारी सायंकाळी ७ वाजता आयोजित या बैठकीला शहरातील विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध व्यायाम शाळा, गणेश व नवदुर्गा मंडळांचे कार्यकर्ते, सामाजिक संस्था, राजकीय पक्ष तथा ज्येष्ठ मंडळी यांच्यासह युवकांची मोठी उपस्थिती होती. यावेळी आयोजन समिती द्वारे शिवराज जाधव यांनी १९ फेब्रुवारीला सकाळी ८ वाजेपासून सुरू होणाऱ्या या सोहळ्याबाबत माहिती दिली. तसेच उपस्थितांकडून नवीन संकल्पना व सूचना ऐकून घेतल्या. त्यानुसार यंदाच्या शिवजयंती उत्सव शिस्तीत, शांततेत व सर्वसमावेशक पद्धतीने साजरा व्हावा यासाठी सर्वांनी उत्साहात सहभागी होण्याचे आवाहन केले. ज्येष्ठ मंडळींनी उपस्थित युवकांना शिवजयंती व्यसनमुक्त व वादविवाद विरहित संपन्न होण्यासाठी महत्वाचे मार्गदर्शन यावेळी केले. बैठकिचे संचालन प्रा डॉ नितीन भुजबळ यांनी केले.

यावेळी काय विशेष

• शहरातील शालेय विद्यार्थी सहभाग.

लेझीम पथक, ढोलपथक व लाठीकाठी पथकांचे पारंपरिक शौर्य सादरीकरण

• सायंकाळी गुणवंत विद्यार्थी, प्रतिभावान खेळाडू व सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार.

• शिवचरित्रावर आधारित आकर्षक देखावे व शिस्तबद्ध लेझिम पथकांना बक्षिसे व गुणगौरव.

• शिवछत्रपतींच्या जिवणावर प्रकाश टाकणारे सांस्कृतिक कार्यक्रम.

• शिवजयंतीच्या निमित्ताने दि.२५ फेब्रु रोजी नुतन विद्यालय प्रांगणात सायं ६ वा. "घरा-घरातील वृद्धाश्रम" या सामाजिक समस्येवर भाष्य करणारे व्याख्यान. 

कार्यक्रमाचे स्वरूप

दि.१९ फेब्रुवारी २०२४ सोमवार 

•  सकाळी ८ वा छ. शिवाजी नगर येथे आई भवानी पुजन व शिवपुतळा माल्यार्पण.

• ८:३० वा छ.शिवाजी नगर येथून महिला मोटारसायकल रॅली.

• ९ वा हनुमान चौक येथून बसस्टँड पर्यंत शालेय विद्यार्थी लेझीम, ढोल पथक व चित्ररथ प्रभात फेरी

• ०९ :३० गो.वि.महाजन शाळा क्रीडांगण येथुन मोटारसायकल रॅली.

• १० वा बसस्टँड येथून ऑटो रिक्षा रॅली.

• दुपारी १२ वा हनुमान चौक येथून भव्य शोभायात्रा व मिरवणूक

• सायं ७ वा हनुमान चौक येथे समारोपीय बक्षीस वितरण समारंभ.