🏵️ देवगड प्रतिनिधी अमोल शिर्के 😄महाराष्ट्र ग्रामीण न्यूज 🏵️
सध्या पुन्हा देवगड समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या बोटीला आग लागलेली आहे संतोष रमेश पेडणेकर यांच्या मालकीची भगवती कृपा नोंदणी क्रमांक IND-MH-4-MM-1614 हे नाव मासेमारी करत असताना या मासेमारी नौकेच्या इंजिनला वायरिंग मध्ये शॉर्टसर्किट झाले व अचानक या होडीला आग लागली. ही घटना देवगड पवन चक्की समोर 12 ते 14 बोटीवरचे खलाशी मासेमारी करण्यासाठी गेलेले होते व या दुर्घटनेमुळे एकच धावपळ उडाली वेळेवर मदत मिळाल्याने नौकेवरील सर्व 21 खलाशांना सुखरूप वाचवण्यात यश आले त्यामुळे मोठा अनर्थ टाळला. मालवण येथील संतोष रमेश पेडणेकर यांच्या मालकीची भगवती कृपा ही नौका जेव्हा खोल समुद्र पाण्यात मासेमारी करण्यासाठी गेली तेव्हा ही घटना इंजिनच्या वायरीचे शॉर्टसर्किट होऊन घडलेली आहे. अशा या घटना देवगड विभागात काही नवीन अशा नाही परंतु अकस्मात असं काही अपघात झाले की पोलीस यंत्रणा तात्काळ त्या ठिकाणी हजर असते. दरम्यान घटनेची माहिती मिळताच एस सिंधुदुर्गाच्या चार या स्पीड बोटी तेथे मदतीला धावून आले व सागरी पोलीस दलाची टीम पाण्याचा पंप घेऊन घटनास्थळी दाखल झाले व सागरी पोलीस दलाचे पोलीस उपनिरीक्षक मिलिंद तांडेल, ए अरुण, ए एस आय धुरी, ए एस आय चंदनशिवे हे घटनास्थळी दाखल होऊन आपले कार्य त्यांनी व्यवस्थितरित्या बजावले आहे. या घटना स्थळी सागरी पोलीस दलाचे पोलीस उपनिरीक्षक मिलिंद तांडेल यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. देवगड समुद्रातील जळीतग्रस्त नौका देवगड बंदरात आणण्यासाठी स्थानिक मच्छीमाराकडून रात्री उशिरापर्यंत प्रयत्न सुरू होते या घटनेची माहिती मिळताच देवगड बंदर येथे मत्स्य परवाना अधिकारी किरण वाघमारे आणि सागर सुरक्षा रक्षक योगेश पाठक तसेच स्थानिक मच्छीमार देवगड बंदर येथे दाखल झाले व देवगड बंदर येथे देवगड जामसंडे नगरपंचायत तिचे अग्निशामक बंब देखील या ठिकाणी हजर होते. देवगड बंदरातील स्थानिक मच्छीमारांनी पोलीस सुरक्षा यंत्रणेला तातडीने मदत केली व व्यवस्थित सहकार्य सुद्धा केले. तेव्हा पोलीस दलाचे व स्थानिक मच्छीमार संघटनेचे कार्यरत असणाऱ्यांचे कौतुक करण्यात आले. अशा जेव्हा मासेमारी करण्यासाठी समुद्रात ज्या बोटी जातात तेव्हा जो अपघात होतो त्यासाठी जे कोणी बोटीचे मालक आहेत त्यांनी आपल्या नौकेची डागडुजी खलाशांना संरक्षण असणारे जॅकेट लाइफ जॅकेट हे होडीवर ठेवण्यात यावे तसेच ज्या काही इंटरनेटच्या सेवा आहेत त्या सुद्धा या मासेमारी नौकेत सामील करण्यात यावे की जेणेकरून धोका निर्माण होणार नाही याची खबरदारी नौकेच्या मालकांनी घेण्यात यावी. नौकेचे इंजिन त्याचे वायरिंग दर सहा महिन्यांनी मासेमारी नवकेच्या मालकांनी त्याचे मेंटेनन्स करावे जेणेकरून असा हा अपघात होणार नाही. ज्या काही मासेमारीच्या नौका आहेत त्याने सुसज्ज असणे हे फार आवश्यक आहे आपली मासेमारीची जी होडी आहे त्याची देखभाल व्यवस्थित राखणे हे त्या मालकाचे काम आहे की जेणेकरून असे अपघात होणार नाहीत व खलाशांचे प्राण सुद्धा जाणार नाहीत याची काळजी ही होळीच्या मालकांनी घेण्यात यावी.🏵️ महाराष्ट्र ग्रामीण न्युज 🏵️
.jpg)