Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

खारघरमध्ये सिडकोच्या अतिक्रमण मोहिमेदरम्यान आदिवासी दिव्यांग व्यक्तीचा मृत्यू; नातेवाईक आक्रमक!

Responsive Ad Here





दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी; मृतदेह ताब्यात घेण्यास नकार

कळंबोली प्रतिनिधी : 

खारघर येथील बेलपाडा आदिवासीवाडीत सिडकोच्या अतिक्रमणविरोधी कारवाईदरम्यान बाळू दत्ता कांबडी (वय ६१) या आदिवासी दिव्यांग व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू केली होती. या कारवाईदरम्यान झोपडी तोडली जात असल्याचे पाहून बाळू कांबडी मानसिक धक्क्यामुळे अस्वस्थ झाले आणि काही वेळातच कोसळले. त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित रहिवाशांकडे घरपट्टी भरल्याच्या पावत्या व इतर कागदपत्रे आहेत. भाजप आमदार विक्रांत पाटील यांनी या घटनेवर संताप व्यक्त करत, अतिक्रमण हटवणे माणसाच्या जीवापेक्षा महत्त्वाचे आहे का, असा सवाल उपस्थित केला.

दरम्यान, मृताचे पुत्र दत्ता कांबडी आणि नातेवाईकांनी संबंधित अधिकाऱ्यांवर ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असून, कारवाई होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेतली आहे.

पनवेल उपजिल्हा रुग्णालयात मृतदेह

मृतदेह शवविच्छेदनासाठी पनवेल उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. संभाव्य तणाव लक्षात घेऊन परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या घटनेमुळे सिडकोच्या अतिक्रमण कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, दोषींवर कारवाई करण्याची मागणी स्थानिक आदिवासी बांधवांकडून केली जात आहे.