Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

दुष्काळ आणि महागाईच्या कात्रीत मध्यमवर्ग; सरकार डोळे उघडून कधी पाहणार?

Responsive Ad Here





15 ऑक्ट २०२६ 

अकोट प्रतिनिधी:सैय्यद मजहर अली 


अकोट : राज्यातील भीषण दुष्काळ, बाजारपेठेतील मंदी आणि दिवसेंदिवस वाढणारी महागाई यामुळे मध्यमवर्गीयांचे मासिक बजेट पार कोलमडून पडले आहे. प्रामाणिकपणे नियमित कर भरून देशाचा आर्थिक गाडा हाकणारा हा सर्वसामान्य नागरिक आज घरखर्च, मुलांचे शिक्षण, औषधोपचार आणि डोक्यावर बसलेल्या कर्जाच्या ईएमआयखाली पूर्णपणे भरडला जात आहे. कोरोना काळातील आर्थिक फटका आणि आता मायक्रोफायनान्स कंपन्यांचा वसुलीचा अमानुष तगादा यामुळे अनेक कुटुंबे गंभीर मानसिक तणावाखाली जगत आहेत.


शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीवर लगेच राजकीय गदारोळ होतो; पण अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार असलेल्या मध्यमवर्गाच्या या विदारक आर्थिक संकटाकडे शासन नेहमीच दुर्लक्ष का करते? कर्जाची पुनर्रचना, व्याज सवलत किंवा थेट दिलासा देणारे धोरण आखून संकटात सापडलेल्या करदात्यांना वाचवणार की मध्यमवर्गाला कायम वाऱ्यावर सोडणार? हा टोकदार सवाल आता सरकारला विचार करायला भाग पाडणारा ठरत आहे.