कळंबोली प्रतिनिधी : श्री.अवधूत साळुंखे
कळंबोलीत गेल्या महिनाभरापासून सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाकडून सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शाखाप्रमुख स्वप्नील घाडगे यांनी कळंबोली येथील सिडको कार्यालयाबाहेर उपोषणाला सुरुवात केली आहे.
या उपोषणाला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत पाठिंबा दिला आहे. गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या अनियमित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून, पाणीप्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी केली जात आहे.
प्रश्न न सुटल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
कळंबोलीतील पाणीपुरवठा लवकरात लवकर सुरळीत करावा आणि नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे. प्रशासनाने या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन तोडगा काढला नाही, तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
आता सिडको प्रशासन या आंदोलनाची दखल घेऊन पाणीपुरवठ्याचा प्रश्न कधी सोडवणार, याकडे कळंबोलीतील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
