Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

श्री सेवागिरी ट्रस्टच्या चेअरमनपदी संतोष ऊर्फ बाळासाहेब जाधव.

Responsive Ad Here


 

बुध  दि [ प्रकाश राजेघाटगे ]

भाविकांना अधिकाधिक सुविधा देण्यासह देवस्थानच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प

 पुसेगाव येथील श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्टच्या चेअरमनपदी संतोष ऊर्फ बाळासाहेब जाधव यांची बिनविरोध निवड झाली.

गतवर्षी डॉ. सुरेश जाधव यांच्या राजीनाम्यानंतर संतोष वाघ यांची चेअरमनपदी निवड झाली होती. एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर वाघ यांनी स्वेच्छेने राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी निवड प्रक्रिया घेण्यात आली.

रविवारी (ता. ११) सकाळी साडेदहा वाजता मठाधिपती श्रीमहंत सुंदरगिरी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली देवस्थान ट्रस्टच्या सभागृहात ही प्रक्रिया पार पडली. चेअरमनपदासाठी संतोष ऊर्फ बाळासाहेब जाधव यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. यावेळी विश्वस्त डॉ. सुरेश जाधव, रणधीर जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख, गौरव जाधव आणि सचिव विशाल माने उपस्थित होते. निवडीनंतर ग्रामस्थांच्या वतीने श्री. जाधव यांचा सत्कार करण्यात आला. 

मावळते चेअरमन संतोष वाघ यांनी आपल्या एक वर्षाच्या कार्यकाळात सहकार्य केल्याबद्दल सर्व विश्वस्त, मठाधिपती श्रीमहंत सुंदरगिरी महाराज आणि ग्रामस्थांचे आभार मानले. सर्वांच्या सहकार्यामुळे देवस्थानच्या माध्यमातून विविध विकासकामे व उपक्रम राबवता आल्याचे त्यांनी सांगितले. यापुढेही देवस्थानच्या विकासासाठी सहकार्य करत राहण्याची ग्वाही त्यांनी दिली.

दरम्यान, श्री सेवागिरी महाराजांच्या यात्रेसाठी येणाऱ्या लाखो भाविकांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देणे, स्वच्छता, पाणीपुरवठा, वाहतूक व दर्शन व्यवस्था सक्षम करणे आणि देवस्थानच्या विकासकामांना गती देणे, यावर भर दिला जाणार आहे. तसेच देवस्थानचा कारभार लोकाभिमुख, पारदर्शक व राजकारणविरहित ठेवून सर्वांनी एकत्रितपणे विकासासाठी प्रयत्न केला जाईल असा विश्वास डॉ.सुरेश जाधव, रणधीर जाधव आणि संतोष वाघ यांनी मनोगतात व्यक्त केला.

चौकट : 

#भाविकांना अधिकाधिक सुविधा देण्यास प्राधान्य

“श्री सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादाने आणि सर्व विश्वस्तांच्या सहकार्याने देवस्थानच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करणार आहे. यात्रेसाठी येणाऱ्या लाखो भाविकांना उत्तम सुविधा उपलब्ध करून देणे, देवस्थानचा कारभार पारदर्शक ठेवणे आणि विकासकामांना गती देणे, याला प्राधान्य राहील.”

— संतोष ऊर्फ बाळासाहेब जाधव, चेअरमन, श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्ट

छायाचित्र: पुसेगाव : नूतन चेअरमन संतोष जाधव यांचा सत्कार करताना डॉ. सुरेश जाधव, रणधीर जाधव व संतोष वाघ.