Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घेणार; उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई यांचे आश्वासन-

Responsive Ad Here


बुध  दि [प्रकाश राजेघाटगे ] 

जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अडीअडचणी आणि मागण्यांबाबत सातारा जिल्हा परिषद सकारात्मक असून, यावर लवकरच योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (डेप्युटी सीईओ) राहुल देसाई यांनी दिले.

महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेचे सातारा जिल्हा अध्यक्ष श्री. जे. के. काळे यांच्या मार्गदर्शनाखालील एका उच्चस्तरीय शिष्टमंडळाने उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर सविस्तर आणि सकारात्मक चर्चा करण्यात आली.


२३ महिन्यांचा कोविड भत्ता व दिवाळी बोनसवर चर्चा


या महत्त्वपूर्ण बैठकीत कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रलंबित मागण्या प्रशासनासमोर मांडण्यात आल्या. यामध्ये प्रामुख्याने कोविड महामारीच्या काळातील २३ महिन्यांचा थकीत भत्ता त्वरित मिळावा, कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तकातील नोंदींमधील विलंब टाळावा, तसेच वेतनातील ग्रामपंचायत हिश्श्याचा फरक आणि राहणीमान भत्ता नियमित मिळावा, अशा मागण्यांचा समावेश होता. याशिवाय, कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी (PF) आणि आगामी सण लक्षात घेता कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी सानुग्रह अनुदान (बोनस) देण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाली.


दुष्काळी परिस्थितीमुळे वसुलीत सूट देण्याची मागणी


बैठकीदरम्यान जिल्हाध्यक्ष श्री. जे. के. काळे यांनी जिल्ह्यातील सद्यस्थितीवर प्रकाश टाकला. "सध्या जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने ग्रामीण भागात कर वसुलीसाठी ग्रामस्थांमध्ये उदासीनता दिसून येत आहे. अशा कठीण परिस्थितीत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामविकास विभागाशी चर्चा करून वसुलीच्या उद्दिष्टात विशेष सूट मिळण्यासाठी पाठपुरावा करण्यात यावा," अशी मागणी काळे यांनी या वेळी केली.


प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती


या प्रसंगी कामगार सेनेचे राज्य उपाध्यक्ष राजन लिगाडे, सचिव सचिन मोरे, उपाध्यक्ष जावेद भाई पठाण आणि कोषाध्यक्ष गणपतराव फडतरे उपस्थित होते. तसेच शिष्टमंडळात संपर्कप्रमुख नवनाथ आवळे, प्रसिद्धी प्रमुख प्रशांत साळुंखे, रामदास वाघचौडे, शिवाजी सावंत, वैभव सणस, धुळा दिडवाघ, उत्तमराव गाढवे, हणमंत गोरे, वैशाली गोरे, श्रीकांत जाधव, अमोल काळोखे आणि दीपक डोंबाळे यांच्यासह जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.