अकोट प्रतिनिधी : सैय्यद मज़हर अली
अकोट शहरातील बसस्थानकावर चोरी करणाऱ्या सात महिला आरोपींना अकोट शहर पोलिसांनी अटक केली. ७ ऑक्टोबर २०२६ रोजी बसस्थानक परिसरात चोरीची घटना घडली होती.
या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा क्रमांक ६९१/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल केला. डी.बी. पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे तपास करून सात संशयित महिलांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस निरीक्षक किशोर जुनघरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पुढील तपास अकोट शहर पोलीस करीत आहेत.
.jpg)