अकोट प्रतिनिधी : सैय्यद मज़हर अली
अकोट तालुक्यातील वडाळी सटवाई येथील डॉ. शीजा मारिया फजलुद्दीन हिने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकच्या अंतिम वर्ष बीयूएमएस परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले. ऐन उझ्न अन्फ हलक व अस्नान या विषयात तिने विद्यापीठात प्रथम स्थान मिळवले. या कामगिरीबद्दल तिला व्हाइस चान्सलर्स सर्टिफिकेट ऑफ मेरिट प्रदान करण्यात आले. शीजाचे शालेय शिक्षण अकोट येथील गर्ल्स उर्दू हायस्कूलमध्ये, तर बारावीचे शिक्षण उर्दू ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्समध्ये झाले. तिचे वडील अकोट येथील बॉईज उर्दू हायस्कूलमध्ये शिक्षक आहेत. तिच्या यशाबद्दल अकोटसह जिल्ह्यातून अभिनंदन होत आहे.
.jpg)