Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

आदमपूरचे नव पोलीस सुनील चिगळे,रियाज शेख चा दीक्षांत सोहळा संपन्न...

Responsive Ad Here

 


ग्रामीण प्रतिनिधी-कपिल भुरे आदमपूरकर 

बिलोली तालुक्यातील ग्राम आदमपूर येथील शेतकरी कुटुंबातील विवाहित युवक तथा नांदेड गृहरक्षक दल माजी होमगार्ड नवप्रविष्ट सशस्त्र पोलीस शिपाई(एसआरपीएफ)सुनील  माधवराव चिगळे आणि आदमपूर नगरीचा भाचा एसआरपीएफ रियाज रज्जाकसाब शेख तमलूरकर यांचा शुक्रवार दि.९ ऑक्टोबर रोजी राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण केंद्र, नानवीज,दौंड येथे सकाळी निमंत्रित दिग्गज पोलीस अधिकारी मान्यवरांच्या उपस्थितीत मुख्य कवायत मैदानात थाटामाटात आणि शिस्तबद्ध पद्धतीने रीतसर संपन्न झाला.

येथील शिपाई सुनील चिगळे (गट क्र.८-मुंबई)यांची परस्थिती बेताची होती.लहानपणी वडीलांचे छत्र हरवले. शेती काम करीत सतत सात आठ वर्ष पोलीस भरतीत सुनील सहभागी होता. दहावीला पाच वेळेस नापास ते एसआरपीएफ असा त्याचा प्रेरणादायक प्रवास आहे.तर येथीलच शिपाई शेख रियाज(गट क्र.२-पुणे)याचे कुटुंब अल्पभूधारक आहे.याआधी केंद्रीय राखीव पोलीस दलात (सीआरपीएफ)ट्रेड्समन शिपाई म्हणून रियाज हैद्राबाद येथे सेवेत होता.त्यानेही आदमपूर येथील आजी आजोबांकडे अगदी लहानपणापासून राहून जिद्दीने आपले स्वप्न साकार केले.

नवप्रविष्ट सशस्त्र पोलीस शिपाई उमेदवारांना वर्षभर पायाभूत खडतर प्रशिक्षण केंद्रात नियमित सुरू होते.नवीन कायदे,सायबर क्राईम,अमली पदार्थ विरोधी उपक्रम,सोशल मिडियावरील गुन्हे,सामाजिक उपक्रम,सामुहिक कारवाया,प्रत्यक्ष शूटिंग जंगल भ्रमंती,स्फोटके निष्क्रिय पद्धत, दंगल  नियंत्रण आणि नागरिकांसवे सकारात्मक समन्वय आदि बाबींचे शास्त्रीय मार्गदर्शन व शिक्षण देण्यात येते.

यावेळी या भव्यदिव्य पासिंग आऊट परेड समारंभास प्रमुख अतिथी पाहुणे म्हणून मा.प्रवीण कुमार पाटील,पोलीस उपमहानिरीक्षक,अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स,पुणे यांची विशेष उपस्थिती होती.नानवीज येथील राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण केंद्र,प्राचार्य जयश्री देसाई,केंद्रातील वरिष्ठ पोलीस अधिकारी,प्रशिक्षक,कर्मचारी,पोलीस शिपाई यांचे नातेवाईक, प्रतिष्ठित नागरिक यांचीही हजेरी होती.