Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

सुपे परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ; मध्यरात्री पावणेतीनच्या सुमारास चार ठिकाणी चोरी

Responsive Ad Here

 

सुपे : सुपे परिसरात चोरट्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून, मध्यरात्री पावणेतीन वाजण्याच्या सुमारास तब्बल चार ठिकाणी चोरीच्या घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी बंद घरे तसेच परिसरातील ठिकाणांना लक्ष्य केल्याची चर्चा असून, एकाच रात्री चार ठिकाणी चोरी झाल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढवावी आणि चोरट्यांचा तात


डीने बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

या चोरीच्या घटनांमध्ये नेमका किती ऐवज चोरीला गेला, याबाबत अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घ्यावा, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.सुपे परिसरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण असून, पोलिस प्रशासन यावर काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे