जाफराबाद प्रतिनिधी
टेंभुर्णी : येथील बसथांब्यावर मंगळवार व बुधवार सायंकाळी पोलिसांनी वाहनांची झडती घेत तपासणी मोहीम राबविली. यावेळी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तसेच नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. टेंभुर्णी परिसरात वाहतूक शिस्त राखणे आणि नियमांचे पालन सुनिश्चित करणे, या उद्देशाने ही कारवाई करण्यात आली. अचानक झालेल्या तपासणीमुळे वाहनचालकांचे लक्ष वेधले गेले. ही मोहीम टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पीएसआय बाबासाहेब खार्डे डोईफोडे शिवलकर गावंडे देशपांडे बेडवाल घोंगे सोनुने तसेच होमगार्ड कर्मचारी पोलीस पथकाने राबविली.
