Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

हिवरखेड येथे अवैध देशी दारू जप्त

Responsive Ad Here

हिवरखेड प्रतिनिधी@ जितेश कारीया

हिवरखेड पोलिसांनी आकाश  दुतोंडे या आरोपीकडून अवैधरित्या विनापरवाना विक्रीकरिता असलेले 72 देशी दारूचे क्वार्टर जप्त केले.
हिवरखेड शहरातील भाऊदेवराव गिर्हे नगर (तत्कालीन इंदिरा नगर) हे विनापरवाना खुलेआम दारू विक्री चे हॉटस्पॉट बनल्याची नागरिकांमध्ये चर्चा असून मागील काही दिवसात हिवरखेड पोलिसांनी केलेल्या अनेक कारवायांवरून हे स्पष्ट झालेले आहे.  तसेच विकास मैदानात ,व वार्ड क्र २ मध्ये  खूप जोरात अवैध दारू सुरू आहे, तरी याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष दिसून येते, 
यातच भर म्हणून 25 मे रोजी हिवरखेड पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल वाणी हे पोलीस कॉन्स्टेबल महादेव नेव्हारे, विनोद गोलाईत, श्रीकृष्ण सोळंके यांच्यासह पेट्रोलिंग वर असताना त्यांना माहिती मिळाली की भाऊदेवराव गिऱ्हे नगर येथे आकाश गणेश दुतोंडे हा कोणताही परवाना नसताना


 अवैधरित्या देशी दारूची विक्री करीत आहे. मिळालेल्या गोपनीय माहितीवरून हिवरखेड पोलिसांनी आकाश  दुतोंडे यांच्या घरी छापा मारून झडती घेतली असता त्याच्या घरी देशी दारूचे 180 मिलीचे 72 कॉर्टर अवैधरित्या विनापरवाना आढळून आले.
अधिक चौकशी केली असता त्याच्याकडे कोणताही परवाना मिळून आला नाही म्हणून हिवरखेड पोलिसांनी दारूसाठा जप्त करून आरोपी आकाश गणेश दुतोंडे यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 ई नुसार गुन्हा नोंदविला आहे. हिवरखेड पोलिसांच्या धाडसी कारवाईने अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.