गणेश पांढरे @प्रतिनिधी जळगाव
जळगांव,दि.: राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने दि .१८ मे रोजी परिपत्रक काढुन राज्य शासनाच्या अधिकारा व कर्मचाऱ्यांचा एक किंवा दोन दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधी मध्ये देणगी म्हणुन देण्याचा आदेश पारीत केलेला आहे . या आदेशावर माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांना तीव्र आक्षेप घेतला असुन राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांचा पगार कपात करू नये म्हणुन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहीले आहे .
मुख्यमंत्र्यांना दिलेल्या या पत्रात माजी मंत्री आ. गिरीश महाजनांनी म्हटले आहे की, राज्य शासनाचे कर्मचारी हे कोरोना योद्धा म्हणुन कोरोना संसर्गाच्या काळात त्यांचे कर्तव्य बजावत आहेत . त्यांच्या कामगिरीवर खूष होवुन सर्वसामान्य नागरिकांकडून ठिक ठिकाणी शुभेच्छाचा , फुलांचा वर्षाव होत असताना राज्य सरकारने मात्र त्यांच्यावर अन्याय कारक आदेश लादला आहे त्या कर्मचाऱ्यातील डाँक्टर, परीचारीका , सफाई कर्मचारी कर्मचारी,पोलीस हे सर्व त्यांचा जीव धोक्यात
घालुन काम करत आहेत त्यांच्यातील काही कर्मचारी हे यामुळे बाधीत सुध्दा होत आहेत . तर काहींना आपला जीव गमवावा मुळे त्यांचा परिवार उघड्यावर आला आहे .त्यांना स्वंतत्र वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देणे गरजेचे असतांना त्यां योग्य सुविधा मिळत नाहीत . अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने प्रोत्साहन भत्ता देणे गरजेचे असतांना त्यांच्याच पगारा मधुन ऐच्छीक का होईना एक / दोन दिवसांचा पगार कपात करणे योग्य होणार नाही . या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता देण्याचा विचार करून सदर कर्मचाऱ्यांच्या पगारातुन कोणतीही कपात करण्यात येऊ नये अशी मागणी या पत्राद्वारे आ . महाजन यांनी मुख्यमंत्र्या कडे केली आहे .