Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

घाटबोरी येथे कोरोना योध्यांचा सन्मान

Responsive Ad Here

नयन खरात @तालुका प्रतिनिधी मेहकर 

दि २८मे२०२० मेहकर तालुक्यातील घाटबोरू ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी कोरोना युद्धामध्ये लढणाऱ्या योध्यांचा, पुष्पवर्षाव करून सन्मान केला.गावामध्ये पथसंचालनाच्या वेळी,महिला भगिनींनी घरासमोर रांगोळी काढून प्रशासनाचे स्वागत केले... मागील दोन महिन्यांपासून शासनाचे अधिकारी,कर्मचारी कोरोना प्रतिबंधासाठी आपला जीव धोक्यात घालून कार्य करताहेत. त्यांचे आभार मानावेत,त्यांच्या विषयी कृतज्ञता  व्यक्त करावी,या दृष्टीने हा कार्यक्रम सोसिएल डिस्टन्स ठेऊन आयोजित केला.यानंतर बस स्टँड वर,या कार्यक्रमाचा समारोप झाला..समारोपाच्या भाषणामध्ये गावकऱ्यांनी यापुढे काय करावं...?त्यादृष्टीने त्यांना  गजानन पाटोळे सहायक गटविकास अधिकारी यांनी मार्गदर्शन केले.
       मुंबई-पुणे सारख्या शहरामधून गावागावात आलेल्या  मंडळीना पंधरा दिवसासाठी विलगीकरण केलेलं आहे. त्यांचा संपर्क येणार नाही,त्यादृष्टीने गावकऱ्यांनी सजग असायला हवं.प्रशासनाने आपल्याला कोरोना संसर्गाविषयी पूर्ण माहिती ,सामाजिक अंतर, हाताची स्वच्छता व आपण घ्यावयाची काळजी याबद्दल वेळोवेळी जागरूक केले आहे..
यापुढे लॉक डाऊन किती दिवस राहील? याबाबत अनिश्चितता वाटते.त्यामुळे आपल्याला,कोरोनासह जगण्याची सवय लागायला हवी.  खरिप हंगाम सुरू होणार आहे तेंव्हा शेतकरी, शेतमजूर बांधवानी विशेष खबरदारी घ्यायला हवी.अकोला-औरंगाबाद ,मुंबई,पुने लोकांचे स्थलांतर चालु आहे  त्यामुळे,आता खरी खबरदारी घेण्याची गरज असल्याचे गावकऱ्यांना  सांगितले.
  जुन्या जीवनशैलीची सवय आपल्याला लावावी लागेल.लिंबू,आवळा,हळद,अद्रक  इत्यादींचा वापर करून, नित्यनियमाने ध्यान,योग,प्राणायाम,व्यायाम करावचं लागेल.तरच आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढेल.त्यामुळे आपण,कोरोनाच नव्हे,इतर कुठल्याही आजाराचा प्रतिबंध करणार यात शंका नाही. व्यसनावर प्रतिबंध करा असे आवाहन त्यांनी गावकऱ्यांना केले.


        याप्रसंगी ,पवार साहेब ठाणेदार डोणगांव,गजानन पाटोळे सहायक गटविकास अधिकारी मेहकर,मुंढे साहेब नायब तहसीलदार, डॉ.विशाल मगर साहेब,सरपंच गजानन  चणेवर,वासुदेवराव खुळे माजी सभापती, विष्णुपंत पाखरे माजी सरपंच,पत्रकार संतोष अवसरमोल, साखकरकर साहेब ग्रामविकास अधिकारी, सुभास नवले,सुरेश राठोड ऑपरेटर यासह पोलीस बांधव,महसूल,आरोग्य विभागाचे कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी आशा,अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या याप्रसंगी श्री संतोष अवसरमोल यांच्या तर्फे सरपंच यांना कपड्याचा जोड आहेर,तर ग्रामविकास अधिकारी व उपसरपंच यांना रुमाल टोपी भेट देऊन,त्यांचा सन्मान केला गेला.