Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती घरातच साजरी करा - शिव अहिल्या शासन प्रदेशाध्यक्ष सौ गीता सोनोने

Responsive Ad Here

शिवदास सोनोने @ जिल्हा प्रतीनिधी बुलडाना


31 मे 2020 रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 295 जयंती आहे दरवर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती अतिशय मोठ्या थाटामाटाने उत्साहाने देशात राज्यात व जिल्ह्यात धनगर समाज बांधवांच्या वतीने व सर्व महाराष्ट्रातील नागरिकाकडून सामूहिक रीत्या साजरीकरण्यात येत असते परंतु यावर्षी कोरोना या महाभयंकर महामा रीमुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन असल्यामुळे कुणालाही समूहाने बाहेर पडणे शक्य नसल्याने प्रत्येक धनगर परिवाराने आपापल्या घरीच मातोश्री पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे सकाळी पूजन करावेव सायंकाळी घरी घरच्या अंगणात गॅलरीत कमीत कमी पाच दिवे लावून दीप महोत्सव उत्साहाने साजरा करावाअसे आवाहन शिव अहिल्या शासन प्रदेशाध्यक्ष सौ गीता सोनोने यांनी केले आहे
अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त घरी अहिल्यादेवी होळकर यांचे जीवन चरित्र चे वाचन करावे तसेच त्यांनी अंगिकारलेल्या तत्त्व प्रणालीचे जीवनात अंगीकार करण्याचा संकल्प करावा तरच खऱ्या अर्थाने अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी होईल.सुरक्षित समाज व स्वस्थ, सुदृढ समाजासाठी सरकारने दिलेल्या नियमांचे , लॉक डाऊन चे पालन करण्याचे आव्हान शिव अहिल्या शासन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सौ गीता सोनोने यांनी केले आहे