सागर रासकर@ प्रतिनिधी नेवासा
अहमदनगर शहरात तसेच जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नगर शहरात आज 15 जणांना तर नगर ग्रामीणमध्ये 5 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीवरून उघड झाले आहे.
आजच्या रुग्णांची संख्या
▪️ तोफखाना परिसर (शहर) : 07
▪️ सिद्धार्थनगर (शहर) : 04
▪️ दिल्ली गेट (शहर) : 02
▪️ बालिकाश्रम रोड (शहर): 01
▪️ नालेगाव (शहर): 01
▪️ संगमनेर (ग्रामीण): 03
▪️ जामखेड (ग्रामीण) : 01
दरम्यान, आज नगर शहरामध्ये सर्वाधिक रुग्ण हे तोफखाना परिसर येथे आढळले असून त्यामध्ये 3 पुरुष, 1 युवक, 2 महिला आणि एका दोन वर्षीय मुलाचा समावेश आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 324 झाली आहे.
