वैभव रोकडे @ प्रतिनिधी नांदुरा ग्रामीण
अलमपूर तालुका नांदुरा मुंबई येथून परत आलेल्या एका व्यक्तीला 20 मे रोजी कोरोना विषाणू समस्यावर पॉझिटिव आला होता तसेच पुन्हा येथून चांदुर बिस्वा येथील असतात व्यक्ती जळगाव जामोद येथील कोरणा पॉझिटिव व्यक्तीसोबत प्रवास केल्यामुळे आरोग्य विभागाने येथील सात व्यक्तींना covid-19 रुग्णालयात भरती केले होते यातील 21 वर्षीय युवकाचा पॉझिटिव्ह रिपोर्ट 27 मे रोजी आला तरी त्याच्या संपन्न झालेल्या व्यक्तीपैकी दोन व्यक्तीचा पॉझिटिव्ह रिपोर्ट आला होता येथील युवकाने आज कोरोना वर मात केली कोरोना पॉझिटिव युवक जिंकला व कोरोना हरला प्रोटोकॉल नुसार मागील दहा दिवसापासून सदर युवकांमध्ये कोरोनाच्या
कोणतीही लक्षणे न आढळल्याने या युवकास नांदुरा येथील आयसोलेशन कक्षांमधून सुट्टी देण्यात आली. मलकापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार मा.श्री.राजेश एकडे यांनी सदर युवकास पुष्पगुच्छ देऊन कोरोनाशी यशस्वी लढाई देऊन त्यावर मात केल्याबद्दल यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या यावेळी नांदुरा येथील तहसीलदार श्री राहुल तायडे, तालुका आरोग्य अधिकारी श्री.खंडारे,नगर परिषदचे अभियंता श्री.नीरज नाफडे व आरोग्य कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. उपस्थितांनी टाळ्या वाजवून सदर युवकास प्रोत्साहन दिले.
आरतीचे कोरोनाविषाणू संबंधित तपासणी अहवाल सुद्धा निगेटिव आल्याने नांदुरा तालुक्यातील काही प्रमाणात दिलासा मिळालेला आहे सर्व नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे
