किरण वाघ प्रतिनिधी जिल्हा बुलढाणा
नांदुरा शहरात कोरोना विषाणू चा पसरण्याची शक्यता वाढली आहे शहरामध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले असून नांदुरा शहरात 29 जून ते 1 जुलै असा 3 दिवसांचा जनता कर्फ्यू ठेवण्याचे जनतेला आव्हान नगर परिषद अध्यक्ष व सदस्य तसेच व्यापारी संघटना व भाजीपाला संघटना नांदुरा च्या वतीने एक प्रसिद्ध पत्रकाद्वारे करण्यात आले आहे या जनता कर्फ्यू मध्ये व्यापारी प्रतिष्ठाने फळे इत्यादी सर्व प्रकारची दुकाने बंद राहतील त्यामुळे नागरिकांनी 3 दिवसाकरीता आवश्यक असलेल्या सर्व साहित्य व तत्पूर्वी
खरेदी करून घ्यावे व कर्फ्यू दरम्यान 3 दिवस नागरिकांनी स्वतःहून घरी राहावे कभी नंतर 4 दिवस व्यापारी प्रतिष्ठाने सकाळी 8 ते 2 वाजेपर्यंत घरी राहतील जनता कर्फ्यू मध्ये दवाखान्या मेडिकल अशा अत्यावश्यक सेवा सोडून बाकी इतर सर्व प्रतिष्ठाने बंद व्हावी या जनता कर्फ्यू ला नागरिकांनी एकत्र येऊन हा यशस्वी करावा तसेच जनता कर्फ्यू नंतर नागरिकांनी सोशल डिस्टंसिंग यांचे पालन करावे व मास्क नेहमी वापर करावा आवश्यकता असेल तेव्हा घरातून बाहेर पडावे असे आव्हान नगर परिषद अध्यक्ष व सदस्य यांनी केले आहे.

