शरद अवचार @सुलतानपूर प्रतिनिधी
सुलतानपूर वार्ड क्र 6मध्ये वाढले घाणीचे प्रमाण. सविस्तर वृत्तांत अशे की सुलतानपूर तालुका लोणार येथील वार्ड क्र 6मध्ये अतिशय घाणीचे प्रमाण वाढले आहे ग्रामपंचायत या वार्ड मध्ये काम करण्यासाठी निष्काळजी पणा करत आहे कारण सध्या कोरोना संसर्ग हा खूप झपाटयाने वाढत आहे शासन प्रशासन वारंवार सूचना देत आहे स्वछ रहा आपल्या आवती भोवती घराच्या समोर चा परिसर साफ सफाई ठेवा
परंतु वार्ड क्र 6ची खप वाईट परस्तिती आहे या वार्ड मधला नाली उपसा दोन आठवडे मिळून एकदा होत होता परंतु आता दोन ते तीन महिन्या पासून नाली उपसा ग्रामपंचायत ने केला नाही या नाल्या मध्ये कचरा घाण जमा होते आणि त्याच्या पासून डास तयार होतात ग्रामपंचायत ही दर महा घरकर भरणा व नळ कर भरणा करून घेते मग गल्या मधली साफ सफाई का वेळेवर का करत नाही आता पावसाचे दिवस सुरु झाले आहे या वार्ड मध्यल्या गल्या मध्ये घाण पाणी साचते व ते घाण पाणी वार्ड मधल्या लोकांच्या घरामध्ये जाते
या मुळे वार्ड मध्य राहणाऱ्या लोकांना अतिशय त्रास सहन करावा लागत आहे करिता ग्रामपंचायत मधल्या सर्व पद अधिकारी यांनी वार्ड क्र 6ची पाहणी करून तात्काळ गल्यी तील नाल्या उपसा करणे दररोज घंटा गाडी सुरु ठेवणे गल्ली मध्ये मुरूम टाकणे या कामाला तात्काळ कामाला सुरवात करावी कामास लवकरात लवकर सुरवात केली नाही तर लोकशाही मार्गाने आम्हाला नाइलाजाने आमरण उपोषण करावे लागेल अशे वार्ड क्र 6ग्रामस्थांनी म्हटले आहे

