Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

लॉकडाऊन मध्ये ऑनलाईन मोबाईल गेम करीत आहे तरुणांचे डोके डाऊन कोणी म्हणतो पब्जी तरी कोणी म्हणतो लुडो

Responsive Ad Here

रोहन आदेवार @ प्रतिनिधी यवतमाळ

        गेम ( खेळ ) हे मनोरंजनाचे साधन आहे पण आज मोबाईल च्या गेम नी मनोरंजन न करता व्यसनाधीन पिढी निर्माण करण्याला सुरुवात केव्हाची झाली आहे.   टाईमपास व कामाच्या ताणातून हलकं होण्यासाठी  खेळ खेळणं नवीन नाही. पूर्वी कॅरम, बुद्धिबळ असे बैठे खेळले जायचे. तसंच मैदानी खेळाचंही चलन होतं.   पण मोबाईल व संगणक क्रांतीनंतर असे खेळ, हळूहळू करत संपुष्टात आले. परिणामी मैदानी खेळांची जागा डिजिटल व आभासी खेळांनी घेतली. बैठे खेळही डिजिटल स्वरूपात आले. त्यामुळे समूह किंवा संघटनात्मक पद्धतीनं खेळले जाणारे खेळ बंद झाले.   

घराबाहेर पडण्यास पालकांनी चिमुकल्यांना मनाई केल्याने, बालपण स्मार्टफोनच्या गेम्सझोनमध्ये अकडले आहे. यामुळे सुटी असूनही व्हर्च्युअल जगात एकमेकांशी मैत्री करीत गेम खेळण्याचा आनंद लुटण्यात विद्यार्थी सध्या व्यस्त आहेत. कोरोना आजारा मूळे बाहेर जाण्यास बंदी सुटी असूनही घराबाहेर पडता येत नसल्याने कंटाळून जात आहे. म्हणून वेळ घालवण्यासाठी मोबाइलवरच गेम खेळावे लागत आहेत.   शाळांना सुट्या लागल्या की,  मनसोक्त खेळायचं किंवा गल्लीजवळच्या उद्यानात बागडायचं, हा शालेय विद्यार्थ्यांचा क्रम. परंतु करोनामुळे  शाळांना सुटी असली, तरीही हे चित्र पहायला मिळत नाही. या सुटीत खेळांचा 'गेम' झाला असून, स्मार्टफोनवर डिजिटल खेळांची नांदी विद्यार्थ्यांनी घातली आहे. त्याचे कारण आहे, करोना विषाणू संसर्गामुळे लागू झालेली  बंदी. 

     अति मोबाईल वापर देऊ शकते आजाराला निमंत्रण.
सेलफोनचे जे electromagnetic रेडिएशन निघतात. त्याचा सर्वात वाईट परिणाम आपल्या ब्रेनवर होतो. शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार अतिरेकी वापरामुळे ब्रेन ट्युमर होण्याची शक्यता असतो.