Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

90 मडकी मोहासडवा नष्ट मौशी चेक येथील घटना : मुक्तीपथ आणि पोलिसांनी केली कारवाई

Responsive Ad Here

गडचिरोली शहर प्रतिनिधी @अभिजीती कत्रोजवार

22 जून 2020 धानोरा मौशी चेक- तालुक्यातील मौशी चेक गावाला लागून वहणाऱ्या नाल्यालगत टाकलेला तब्बल 90 मटकी मोहसडवा पोलिसांनी व मुक्तीपथ चमूने नष्ट केला. शनिवारी हि कारवाई आली. 
सडव्या सोबत दारू गडण्याचे साहित्य पण नष्ट केले.
मोशी चेक या गावात अंदाजे 40 जण गावठी दारू काडुन त्याची विक्री करतात. आसपासच्या अनेक गावांना  या दारू विक्रीचा त्रास होतो. येथील नाल्यालगत मोठ्या प्रमाणात मोहाचा सडवा  टाकल्याची माहिती मुक्तीपथ उपसंघक श्री रेवनाथ मेश्राम याना गावातूनच मिळाली. त्यांनी गडचिरोली पोलिसांच्या मदतीने गावाजवळील नाल्याच्या परिसर शोधून काढला . त्यावेळी तब्बल10 ठिकाणी जमिनीखाली मडक्यात गडललेला एकूण 90 मोहसडवा सापडला. हा  सर्व सडवा मडक्यासहित पोलिसांनी व मुक्तीपथ चमूने नष्ट केला. 
सोबतच दारू गाळण्यासाठी वापरण्यात येणारी लपून ठेवलेली भांडी हि मिळाली . तब्बल दीड लाखाचा मुद्देमाल यावेळी नष्ट करण्यात आला . पोलीस निरीक्षक प्रदीप चौगावकर यांच्या मार्गदर्शनात बिट जमादार भाष्कर ठाकरे , प्रमोद वाळके व दिनकर मेश्राम यांनी ही कारवाही केली. भिकारमौशी येथील माजी पोलीस पाटील दिवाकर निलेकर देखील या कारवाहीत सामील होते .
दारू विक्रेत्यांची घरांची झडती राज्याच्या शेवटच्या टोकाला असलेला धानोरा तालुक्यातील सावरगाव येथे शनिवारी येथील पुलीस निरीक्षक कुमार ढेरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस सहकर्यांनी दारू विक्रेत्यांच्या घरची तपासणी केली यावेळीं एका घरी सापडलेला सडवा नष्ट केला. तसेच इतर विक्रेत्यांना दारू विक्री पूर्णतःथंबविण्यासाठी तंबी दिली 
 मुक्तीपथ तालुका प्रेरक अक्षय पेद्दीवर यावेळी उपस्थित होते