Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

बोदवड शहर अतिक्रमणाच्या विळख्यात

Responsive Ad Here
बोदवड प्रतिनिधी प्रमोद राजपूत

बोदवड शहराची ओळख जळगाव जिल्ह्यातील सर्वात लहान दुष्काळी तालुका अशी आहे. ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायत मध्ये झाले विकास कामाला गती सुद्धा आली  निवडणुकीच्या वेळेस निवडून येण्यासाठी उमेदवार लाखो रुपये खर्च करतात ज्यांच्याकडे पैसा तोच निवडणूक जिंकणार मंग उमेदवार अशिक्षित असला तरी चालेल पण पैसा पाहिजे एकीकडे प्रशासन कोरोना शी संघर्ष करीत असताना दुसरीकडे शहरात अतिक्रमणाची हद्द संपत असून कोणी रातोरात सौचालय पाडणे कोणी सौचालया च्या जागी दुकान उभे करतात गावातील तलावाच्या चारही बाजूंनी अतिक्रमण सुरू केले असून तलावात येणाऱ्या पावसाचा पाण्याला प्रश्न आहे की कुठल्या बाजूने येऊ काही दिवसानंतर तलाव कोरडा होईल आणि तलावाचा अतिक्रमण होईल यात शंका नाही मोठे अतिक्रमण करतात तर लहान्याणि का नाही नाही करावे या उक्तीप्रमाणे अतिक्रमण करणारे दादाभाऊ च्या 


भरोशावर अतिक्रमण करतात परंतु याचा रहदारीचा सर्वसामान्यांना त्रास होतो त्यामुळे दादा भाऊंनी सुद्धा अतिक्रमणधारकवर कानाडोळा करीत स्वतःचे अतिक्रमण असते सामान्य नागरिकाला साधी परवानगी घेण्याचे असल्यास जागा स्वतःची बांधकाम स्वतःचं मात्र परवानगी नगर पंचायतीची त्यासाठी नगरपंचायतीची पन्नास हजाराची पावती फाडावे लागते नागरिकांना पैसे द्यावे लागतात परंतु ज्यांनी अतिक्रमण केले आहे किंवा जे अतिक्रमण करत आहे त्यांनीसुद्धा रीतसर नगरपंचायतीची परवानगी काढलेली असेल असे वाटते म्हणून मुख्य अधिकारी हे शासनाचे अधिकारी प्रतिनिधी असून सुद्धा अतिक्रमण काढण्यात धजत नाही आणि यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यास धजत नाही अशाप्रकारे यांच्यावर शासनाकडून कोणतीही कारवाई होत नाही.