शिवदास सोनोने@ प्रतिनिधी जिल्हा बुलढाणा
जळगाव जामोद खरीप पेरणीसाठी जूनमध्ये कर्ज हवे असताना विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखाधिकारी पीक कर्ज देण्यासाठी ऑगस्ट महिन्यात शेतकर्यांना बोलावत आहे. शासन निर्णय असतानाहीष शाखाधिकारी शेतकर्यांना उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने सुनगावच्या संतप्त शेतकर्यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आज, 8 जून रोजी सकाळपासून उपोषण सुरू केले आहे
ज्या शेतकर्यांचे महात्मा जोतिबा फुले कर्जमुक्ती योजनेत आधार प्रमाणिकरण झाले आहे मात्र त्या शेतकर्यांची नावे कर्जमुक्त यादीत समाविष्ट आहेत, अशा शेतकर्यांना कर्ज देण्याबाबत शासनाने निर्णय दिला आहे. तरीही बँक शाखा व्यवस्थापक शेतकर्यांना त्रास देत आहेत. खरीप पेरणीसाठी जूनमध्ये कर्ज मिळावे. शेतकर्यांची पायपीट थांबविण्यासाठी सुनगाव येथे नवीन कृषी कर्ज वाटप मेळावा घ्यावा, अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे. उपोषणात अशोक काळपांडे, महादेव धुर्डे, पुंडलिक पाटील, मोहनसिंह राजपूत, रमेश कोथळकार यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी झाले

