गणेश पांढरे @ जळगाव प्रतिनिधी
जामनेर तालुका शेदुणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे ग्रामीण रुग्णालय व्हावे यासाठी तालुका राष्ट्रवादीचे नेते संजय गरुड यांनी आरोग्य मंत्री नामदार राजेश टोपे हे जिल्हा दौऱ्यावर आले असता निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
या निवेदनात असे म्हटले आहे की शेंदुर्णी हे मोठे गाव असून येथील लोकसंख्या 40000 आहे तसेच आसपासच्या पंधरा खेड्यांचे मिळून वीस हजार लोकसंख्या असे आरोग्यासाठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर अवलंबून आहे. मुंबई नागपूर राज्यमार्गावरील अपघाती रुग्ण सुद्धा अवलंबून आहे. सोबतच शाळा-कॉलेजेस मोठ्या सहकारीताल संस्था मोठे व्यापारी बाजारपेठ असून हजारोच्या संख्येने नागरिकांचे आवागमन सुरू असते. त्यामुळे प्राथमिक उपचार व्यतिरिक्त मोठे उपचार होऊ शकत नाही. येथून 15 किमी अंतरावर पहूर ग्रामीण रुग्णालय तर 50 किमी अंतरावर जिल्हा रुग्णालय आहे. त्यामुळे एखादा त्या वस्तू रुग्णास सेवांना मिळाल्याने वेळप्रसंगी प्राणही गमवावा लागतो. लोकसंख्येच्या मानाने आरोग्यसेवा अपूर्ण पडत आहे. तसेच येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वर्षाकाठी चारशेच्या वर महिलांचे प्रसुती होते. वेळप्रसंगी पहुर अथवा जळगाव येथे पाठवावे लागते. त्यामुळे येथे ग्रामीण रुग्णालय झाल्यास महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच 2010 मध्ये तत्कालीन ग्रामपंचायत चा ठराव देण्यात आलेला आहे. त्यामुळे प्राधान्यक्रमाने याचा विचार होऊन शेंदुर्णी प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रुपांतर व्हावे असे निवेदनाद्वारे श्रीयुत गरुड यांनी म्हटले आहे.
प्रतिक्रिया
संजय गरुड, माजी जि प सदस्य
मागील दहा ते पंधरा वर्षांपूर्वी ची मागणी बघता मध्यंतरीच्या काळात युतीचे सरकार आले तालुक्याचे आरोग्य मंत्री असताना देखील त्यांनी या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे सध्याचे महाविकास आघाडी सरकार हे नागरिकांच्या प्रश्नांबाबत संवेदनशील असून त्यासाठी आरोग्यमंत्री मा.ना. राजेश टोपे यांच्याकडे याबाबत मागणी केली असता त्यांनी योग्य ती माहिती घेऊन लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले आहे.
