शिवदास सोनोने @जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा
सध्या दुधाचे दर कमी झाल्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. गेल्या तीन महिन्यापूर्वी मिळणारा प्रतिलिटर 32 रुपये भाव आता वीस रुपये प्रति लिटर इतका झाला आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी आणखीनच अडचणीत सापडला आहे. अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी कर्ज काढून दुग्ध व्यवसाय सुरू केला आहे. परंतु गेल्या तीन महिन्यात जागतिक महामारी कोरोना चे कारण सांगून दूध संघाने अचानक दर कमी केले आहेत. त्यामुळे पशुखाद्य , औषधोपचार, यांचा खर्च पदरमोड करून करावा लागत आहे. अश्या परिस्थितीमुळे महाराष्ट्रातील सर्व दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे . तरी शासनाने पूर्वीप्रमाणे दुधाला भाव देऊन, सद्यपरिस्थितीत ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मागील महायुती सरकारमधील मा.दुग्ध विकास मंत्री मा. महादेवजी जानकर यांनी प्रति लिटर पाच रुपये थेट अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करून त्यांना धीर देण्याचे काम केले होते.
त्याच पद्धतीने सद्य परिस्थितीचा व अडचणीतील शेतकऱ्यांचा विचार करून या सरकारने सुद्धा जानकर पॅटर्न प्रमाणे किमान दहा रुपये प्रति लिटर अनुदान शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करून शेतकऱ्यांना आधार द्यावा .अन्यथा शेतकरी उध्वस्त होऊन शेतकरी आत्महत्येच्या प्रमाण वाढेल व यात पूर्णपणे सरकार जबाबदार राहील असे या निवेदनात म्हटले आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांचा गांभीर्यपूर्वक योग्य विचार न झाल्यास राष्ट्रीय समाज पक्षाकडून संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर आंदोलन करण्यात येतील असा इशारा यावेळी धनश्रीताई काटीकर पाटील यांनी दिला. सदर निवेदनावर भगवान बावणे रासप नेते, प्राध्यापक प्रकाश थाटे जिल्हा संघटक, शिवदास सोनोने जिल्हा उपाध्यक्ष, संतोष वानखेडे शहराध्यक्ष यांच्या स्वाक्षरी आहे.

