राजू कलाने@अमरावती प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस हे महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान त्यांची अमरावती येथे दौऱ्यादरम्यान कोरोणाच्या या महामारी मध्ये लॉकडाऊन दरम्यान अमरावती अतिशय वाईट परिस्थिती आलेल्या मातंग समाजाची व्यथा दिनांक 29 जून ला भाजपा अनुसूचित जाती विभाग ग्रामीणचे पदाधिकारी सुधीर थोरात व रमेश अंभोरे यांनी जिल्ह्यातील मोठ्या संख्येने वास्तव्यास असलेला मातंग समाजाची व्यथा आज विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणीस यांना निवेदनाद्वारे मांडण्यात आली. ज्यामध्ये मातंग समाज हा उपेक्षित
समाज असून त्यांचा एकमेव व्यवसाय बँड चा आहे. कोरोणा या महामारी मुळे मातंग समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे मातंग समाजाला दरमहा15000 रू गी मानधन म्हणून देण्यात यावे हि विनंती. निवेदन देते वेळी निवेदीता चौधरी अध्यक्ष भा.ज.पा.अमरावती ग़ामीण. शहर अध्यक्ष किरण पातुरकर. शहर अध्यक्ष अनु जाती आघाडी. सुधीर थोरात. ग़ामीण अध्यक्ष अनु जाती आघाडी रमेश अंभोरे यांच्या समवेत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते यानां देण्यात आले.

