Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

पेट्रोल डिझेल दरवाढीविरोधात बुलडाणा काँग्रेसकडून केंद्र सरकारचा निषेध, धरणे आंदोलन, राष्ट्रपतींना निवेदन

Responsive Ad Here
शिवदास सोनोने @  प्रतिनिधी  जिल्ह बूलढाणा 

कोरोनाच्या राष्ट्रीय आपत्तीचा सामना करीत असतानाच  पेट्रोल डिझेलचे वाढत्या भावाने सामान्य जनता त्रस्त झाली आहे. केंद्र सरकारच्या इंधन दरवाढीविरोधात बुलडाणा जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात आज आंदोलन करण्यात आले. जस्तंभ चौकात धरणे देण्यात आले . त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय च्या बाहेर घोषणा देत केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला. जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांच्या मार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले. देशभरात दिवसागणिक इंधन दरात वाढ होत आहे. 



आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचे दर कमी असताना त्याचा थेट फायदा सामान्य जनतेला दिला जात नाही. वास्तविक पाहता आंतररष्ट्रीय बाजारातील कच्या तेलाच्या किमतीचा विचार करून देशांतर्गत इंधनाचे दर ठरविले जात असताना सध्या ती पारदर्शकता राहिली नसल्याचा आरोप काँग्रेसने केला. पेट्रोल डिझेलच्या किमती कमी करून सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी काँग्रेसने केली आहे. यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ , श्याम उमाळकर, विजय अंभोरे, दिलीप कुमार सानंदा, मनोज कायंदे शैलेश खेडेकर प्रदीप मोरे  मीनल आंबेकर,  तालुका सुनील तायडे, तसेच  काँग्रेस पक्षाचे जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.